0

पहिल्या दिवसअखेर भारताने 2 बाद 215 केल्या आहेत. यामध्ये पदार्पण करणाऱ्या मयांक अग्रवालचे अर्धशतक लक्षवेधी ठरले.


मेलबर्न - ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने सामन्याची अत्यंत सावध सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने 2 बाद 215 केल्या आहेत. यामध्ये पदार्पण करणाऱ्या मयांक अग्रवालचे अर्धशतक हे भारतीय डावाचे वैशिष्ट्य ठरले. पुजाराही 68 धावांवर नाबाद आहे. तर कोहली अर्धशतकापासून फक्त 3 धावा दूर आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांच्या अपयशाने भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे या सामन्यात फलंदाजांनी सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळते आहे.

असा राहिला पहिला दिवस
>> भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
>> भारताच्या डावाची सुरुवात हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल या दोन्ही नवख्या फलंदाजांनी केली 
>> हनुमा विहारी अवघ्या 8 धावांवर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का लवकर बसला. 
>> मयांक अग्रवालने मात्र पदार्पणात अर्धशतकी खेळी करत निवड सार्थ करून दाखवली. 
>> पुजारानेही डाव सावरण्यास मदत केली. त्याने 68 धावा करत मालिकेत चांगल्या कामगिरीचे सातत्य ठेवले.
>> मयांक अग्रवाल 76 धावांवर बाद झाला. 
>> मयांक नंतर आलेल्या कोहलीने दिवसअखेर नाबाद 47 धावा केल्या. 
>> कोहली आणि पुजाराने डावाची पडझड होऊ दिली नाही. 
>> भारताच्या दिवसभरातील दोन्ही विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याने घेतल्या.India started patiently on first day of third test in Melbourne

Post a Comment

 
Top