0
‘तुम्ही तर कधी कधी पॉझिटिव्ह होत असाल. आमचे तर आयुष्यच पॉझिटिव्ह आहे, आम्ही एचआयव्ही पॉझिटिव्ह आहोत.’

लातूर- लातूर जिल्ह्यातील रहिवासी रवी बापटले पत्रकार होते. 2007 मध्ये त्यांची भेट एका एचआयव्ही बाधित मुलाशी झाली. गावकऱ्यांनी त्याला बहिष्कृत केले होते. रवीने त्याच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली. हासेगाव (जि.लातूर) येथील आपल्या जमिनीवर सेवालय आश्रम उघडला व तिथे या मुलाची राहण्याची व्यवस्था केली. मात्र, एक-एक करेत असे अनेक एचआयव्ही बाधित रवीला भेटू लागले, ज्यांना कुटुंबीयांनी, गावकऱ्यांनी बेदखल केले होते. या सर्वांना सोबत घेऊन रवी यांच्या पुढाकारातून त्यांच्यासाठी एक छोटेसे गावच उभारण्यात आले. या गावाला नावही अनोखे दिले आहे...‘एचआयव्ही- म्हणजेच हॅपी इंडियन व्हिलेज.’

एचआयव्ही बाधित लोक या गावात राहू लागले, मात्र परिसरातील लोकांकडून त्यांना विरोध होऊ लागला. रवी यांनी त्यांनी समजावून सांगितले. ‘एचआयव्ही’ हा काही संसर्गजन्य रोग नाही. रुग्णांना एकटे कसे सोडता येईल? हळहळू गावकऱ्यांनाही रवी यांचे म्हणणे पटू लागले आणि त्यांनी या सर्वांना आपलेसे केले. गेल्या 11 वर्षांत या ठिकाणी 50 मुले राहायला आली आहेत. यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 28 जण आहेत. तरुण, ज्येष्ठांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते. विशेष म्हणजे रवी बापटले या कामासाठी कोणतेही सरकारी अनुदान घेत नाहीत.


11 वर्षांत एकाही एचआयव्ही बाधित रुग्णाचा मृत्यू नाही
या गावातील सर्व लोक रोज सकाळी व्यायाम करतात. नंतर मुले शाळेत निघून जातात. मोठी माणसे प्रशिक्षण घेतात. सायंकाळी करमणुकीचे कार्यक्रम होतात. तपासणीसाठी डॉक्टर नियमित येतात. सुदैवाने 11 वर्षांत येथील एकाही एचआयव्ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

रवी म्हणतात- ‘अशी संस्था तर बंदच पडायला हवी..’
‘या गावासोबत तुमची संस्थाही मोठी होत आहे...’ याकडे लक्ष वेधले असता रवी बापटल म्हणाले, ‘अशी अजून एखादी संस्था व्हावी असे मला वाटत नाही. अशी संस्था खरे तर मोठी होऊ नये, बंदच पडायला हवी. भविष्यात एकही मुलगा एचआयव्ही पॉझिटिव्ह होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. तसेच अशा रुग्णांसोबत भेदभाव करणारा समाजही नसावा. सर्वांनी सोबत राहायला हवे.’ या गावात राहणारे लोक इतरांपेक्षा तसूभरही कमी नाहीत. येथील मुले म्हणतात- ‘तुम्ही तर कधी कधी पॉझिटिव्ह होत असाल. आमचे तर आयुष्यच पॉझिटिव्ह आहे, आम्ही एचआयव्ही पॉझिटिव्ह आहोत.’HIV Means Happy Indian Village given by Ravi Bapatale in Latur

Post a Comment

 
Top