महिलेने अल्ट्रासाऊंड केल्यानंतर तिला आणखी एक मोठा धक्का बसला. त्यानंतर तिला 20 वर्षे जुनी स्टोरी आठवली.
असेक्स - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेना अनेक दिवसांपासून उल्टीसारखा त्रास होत होता. तसेच तिचे पोटही दुखायचे. गर्भाशयात गाठ असेल असे तिला वाटले होते. आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर झाला असल्याची दाट शक्यता तिला वाटू लागली. पण जेव्हा ति डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिला समजले की, तिला कॅन्सर झाला नसून ती प्रेग्नंट आहे. हे ऐकूण महिला एकदम सरप्राइज झाली. महिलेला 20 वर्षांपूर्वी जन्मलेली एक मुलगी आहे. एवढ्या वर्षांनी पुन्हा गर्भवती होणे तिच्यासाठी शॉकिंग होते.
डॉक्टर म्हणाले-कॅन्सर झालेला नाही
- ही स्टोरी इंग्लंडच्या असेक्समधील ग्रेन्स येथे राहणाऱ्या जॅनी फर्नर नावाच्या 45 वर्षीय महिलेची आहे. ती पती गॅरी आणि 20 वर्षांची मुलगी मियाबरोबर राहते. याचवर्षी एप्रिल महिन्यात जेनीला खूप उलट्या होऊ लागल्या. पोटहू दुखू लागले.
- या लक्षणांनंतर तिला वाटले की आपल्या पोटात गाठ आहे. गुगलवर माहिती घेतली तर तिला वाटले की ही लक्षणे कॅन्सरची आहे. त्यामुळे तिला वाटले आपल्याला नक्की कॅन्सर झाला आहे.
- त्यानंतर ती उपचारासाठी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांच्या सांगण्यावरून तिने अल्ट्रासाऊंड केले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले तिला कन्सर वगैरे झालेला नसून ती 17 आठवड्यांची गर्भवती आहे.
- जेनीसाठी हा एक धक्का होता. कारण तिला फक्त एक मुलगी होती आणि तिचा जन्म 20 वर्षांपूर्वी झालेला होता.
वर्षातून फक्त दोनदा येतात पिरियड्स
- जेनीला लग्नाच्या पूर्वीपासूनच PCOS (पॉलिसिस्टीक अंडाशय सिंड्रोम) नावाचा आजार आहे. त्यामुळे तिची आई बनण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळेच 20 वर्षांपूर्वी ती आई बनली तेव्हाही खूप त्रास झाला होता.
- पहिल्या मुलीच्या जन्मानंतर त्यांनी दुसऱ्या बाळाचा विचार सोडला होता. पण त्यांना हे सरप्राइज मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
- PCOS च्या त्रासामुळे जेनीला वर्षातून फक्त दोन वेळाच पिरियड्स येत होते. त्यामुळे तिला गर्भवती राहण्याची फार भीती नसलायची.
- ऑक्टोबर 2018 मध्ये तिने एका बाळाला जन्म दिला. त्याचे नाव ऑलिव्हर आहे. मियालाही भाऊ भेटल्याने ती अत्यंत आनंदी आहे. दोघांचत्या वयात फरक असल्याने मियाही त्याच्यासाठी आईसारखीच असेल असे जेनी म्हणते.

Post a Comment