0
अमृता यांनी खुद्द आपल्या फेसबुक आणि इंस्ट्राग्राम अकाउंटवर या डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मुंबई- महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा 'बाजीराव मस्तानी' सिनेमातील 'मै दिवानी-मै मस्तानी हो गयी' या साँगवरील डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका घरगुती लग्न समारंभात अमृता फडणवीस यांनी अफलातून डान्स सादर केला.
अमृता यांनी खुद्द आपल्या फेसबुक आणि इंस्ट्राग्राम अकाउंटवर या डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये एका घरगुती कार्यक्रमातील 'आनंदाचे क्षण' असेही त्यांनी लिहिले आहे. 'मै मस्तानी हो गई...' या गाण्यावर अमृता यांनी हुबेहुब डान्स केला आहे. अमृता यांच्या या डान्सला नेटीझन्सकडून भरभरून दाद मिळत आहे. 'अमृता Exellent peformance आणि keep it up' अशा कमेंट करुन नेटीझन्सने अमृता फडणवीस यांना प्रोत्साहन दिले आहे.

Post a Comment

 
Top