उदयपुर- उद्योगपति मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशाचे आनंद पीरामलसोबत होणाऱ्या लग्नाची प्री-वेडिंग सेरेमनी शनिवारी सुरू झाली आहे. येथे पीछोला तलावाच्या किनाऱ्यावर हॉटेल ओबेराय उदय विलासमध्ये सगतळ्यात आधी श्रीनाथजीची महाआरती केली गेली. या दरम्यान श्रीनाथजी समोर नीता अंबानी मधुराष्टकवर मंत्रमुग्ध होऊन नृत्य केले. स्टेजवर आठ सितारवादक आणि तबला वादक होते. शंख आणि झांझपण वाजवले. महाआरतीची सुरूवात नाथद्वारा मंदिराचे प्रमुख विशाल बावा यांनी केले.
या दरम्यान नीता अंबानी म्हणाल्या- लेट्स ज्वाइन टुगेदर फॉर महाआरती, आय वेलकम यू ऑल. त्यानंतर पाहून्यांना दिवा असलेली छोटी थाळी देण्यात आली. अंबानी कुटुंब आणि सगळ्या पाहून्यांनी जय जगदीश हरे...ने सुरूवात करून श्रीनाथजीची आरती केली. या दरम्यान अधरं मधुरम् वदनम् मधुरम्, मधुराधिपते अखिलम् मधुरम्...(मधुराष्टकम), कर्पूरगौरं करुणावतारम्...चे स्वरही सगळीकडे वाजत होते.
प्रोजेक्टरने बदलेले ठाकुरजीचे श्रृंगार
महाआरतीसाठी लावण्यात आलेली श्रीनाथजीची 35 फूट ऊंच प्रतिमा पांढरी होती, पण याचा श्रृंगार तसा बदलत गेला, जसा नाथद्वाराच्या श्रीनाथजी मंदिरच्या रोजच्या देखाव्या प्रमाणे करण्यात आली. यासाटी मोठे प्रेजेक्टर लावण्यात आले, त्यासोबतच लाइटिंग इफेक्ट्सने ठाकुरजीच्या प्रतिमेवर मंगला, श्रृंगार, भोग आणि शयनचे देखावे होते.
प्री-वेडिंग सेलिब्रेशन पहिला दिवस होता खास
पहीले ईशाने आई नीतासोबत हॉटेलच्या सुइटमध्ये फोटो शूट केले. यात ईशाने लाल लेहंगा घातला होता. त्यानंतर गोल्डन लेहंगा परिधान करून पार्टीत आली. शनिवारी संध्याकाळी गाला डिनरसोबतच संगीत कार्यक्रम झाला. यात अरिजीत सिंहने परफॉर्मेंस दिला. त्यानंतर वैभवी मर्चेंटच्या कोरियोग्राफीमध्ये पाहूण्यांनी नृत्य केले.

Post a Comment