0
पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील अनिल सुभाष शिंदे (वय 34) याने पत्नी सीमा अनिल शिंदे (वय 30) हिचा गळा चिरून व पोटावर, पाठीवर धारधार शस्त्राने वार करुन निघृण खून केला व त्यानंतर त्याने स्वतः आपल्या पोटावर वार करून आत्महत्या केली. हा सर्व प्रकार अनिलचा 11 वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर घडला. या घटनेने महाबळेश्वरात एकच खळबळ माजली आहे. 
   बुधवारी अनिल शिंदे (रा. वडार सोसायटी ऑफिस जवळ, विश्रांतवाडी, धानोरी पुणे) हा आपली पत्नी व मुलगा यांना बरोबर घेवून महाबळेश्वर फिरायला आला होता. सुभाष चौकाजवळील एका लॉजमध्ये त्याने राहण्यासाठी 204 क्रमांकाची खोली घेतली. शहर व परिसरात थोडे फिरल्यानंतर रात्री जेवण करून ते आपल्या रूमवर आले. रात्री 1 च्या सुमारास एका महिलेच्या किंचाळण्याने परिसरातील शांतता भंग पावली. हॉटेलमधील व्यवस्थापक आणि मालक हे महिलेच्या आवाजाच्या दिशेने धावले व रूममधील 11 वर्षाच्या मुलाने रूमचा दरवाजा उघडला आणि जे चित्र दिसले ते पाहताच दोघांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. खोलीत दाम्पत्य रक्ताच्या थारोळय़ात पडले होते. मालकाने त्यांच्या 11 वर्षाचा मुलाला बरोबर घेतले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून त्यांनी तातडीने पोलीस ठाणे आणि रुग्णवाहिका यांना फोन केला. घटनेची खबर मिळताच सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड हे आपल्या सहकाऱयांबरोबर घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ रुग्णवाहिकाही तेथे आली. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या दोघांना उचलून रुग्णवाहिकेत घालून त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी दोघेही मृत झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लॉजमधील खोलीची पाहणी केली व तेथील सर्व साहित्य ताब्यात घेतले

Post a Comment

 
Top