0
शासनावर राेष अादिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनाेखे अांदाेलन

जळगाव- आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी व इतर आदिवासींवर होत असलेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी व सरकारने दिलेल्या आश्वासन पूर्ण करण्यासाठी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे बुधवारी दुपारी दोन वाजता "मस्का मारो' आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचे मुखवटे लावून स्नान करत मस्का लावण्यात आला. यात समाजातील महिला व पुरुषांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. आंदोलनादरम्यान विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव येथील जाहीर सभेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चाळीसगावच्या सभेत समाजाला प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चार वर्ष उलटूनही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे सरकारला मस्का मारण्याशिवाय पर्याय नसल्याने हे मस्का मारो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस व राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचे मुखवटे लावत त्यांना दूध व तुपाने स्नान घालत मस्का लावण्यात आला. एवढे करूनही शासन यावर तोडगा काढणार नसेल तर या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ यांनी दिला. या आंदोलनावेळी गुलाब बाविस्कर, योगेश बाविस्कर, दौलत कोळी, अरुण इंगळे, कमलाबाई बाविस्कर, ऊर्मिला सपकाळे, कल्पना शंकपाळ, मंगलाबाई सोनवणे, वत्सलाबाई सोनवणे, योगिता सपकाळे, वैशाली कोळी, सपना कोळी, रतन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
अनुसूचित जमातीचे दाखले मिळण्यासाठी आदिवासी कल्याण समितीने केलेल्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, अनुसूचित जमातीचे दाखले आठ दिवसांत निकाली काढावेत, शासनाच्या विविध योजना टोकरे कोळी व महादेव कोळी समजाच्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात.
विविध प्रकारचे आंदोलन
आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे आतापर्यंत रेल रोको, रास्ता रोको, जल समाधी, मुंडन, आत्मदहन, उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चे आदी प्रकारची आंदोलने करण्यात आली आहे. मात्र, तरीही या मागास समाजाकडे सरकार लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. अजूनही आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.Movement to fulfill government assurances in Jalgoan

Post a Comment

 
Top