0
विद्यापीठातील प्राध्यापकांनी हा पुतळा हटवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.

अकरा - आफ्रिकी राष्ट्र घाणा येथील विद्यापीठ परिसरात लावलेला महात्मा गांधींचा पुतळा एका रात्रीत हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी घाणा येथील प्रतिष्ठित विदयापीठाच्या कॅम्पसमध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, ज्या नेत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काळे-गोरे असा भेद मिटवण्यासाठी लढा दिला, त्यालाच येथील विद्यार्थ्यांनी वर्णद्वेषी ठरवले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा पुतळा मंगळवारी रात्रीच विद्यार्थ्यांनी कॅम्पसमधून हटवला आहे.


- दोन वर्षांपूर्वी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घाणा दौरा केला होता. त्याच दौऱ्यात मुखर्जींच्या हस्ते अकरा येथील विद्यापीठ परिसरात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मुखर्जींनी हा पुतळा दोन्ही देशांच्या मैत्रीचे प्रतिक ठरेल असे म्हटले होते. परंतु, अनावरण केल्याच्या काही दिवसांतच विद्यार्थ्यांनी या पुतळ्याला विरोध सुरू केला. विद्यापीठातील प्राध्यापकांनी हा पुतळा हटवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. त्यानुसार, गांधींवर वर्णद्वेषी असे आरोप करण्यात आले.
- महात्मा गांधींनी आपल्या लिखानात कथितरित्या काळ्या लोकांचा काफिर असा उल्लेख केला होता. तसेच भारतीय काळ्यांच्या तुलनेत खूप श्रेष्ठ आहेत असे म्हटले होते. याचिकाकर्त्यांनी कोर्टात आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी गांधींनी लिहिलेले काही पत्र आणि कथित लिखान सुद्धा सादर केले. "भारतीयांना काफिर करण्याचा दबाव टाकणाऱ्या युरोपियन्स विरोधात आमचा चिरंतन संघर्ष राहील." गांधींनी काफिरचा अर्थ "शिकार करणे हाच व्यवसाय असलेले काफिरांचा उद्देश हाच असतो की ते पत्नी मिळवण्यासाठी जास्तीत-जास्त जनावरे कसे गोळा करतील. जेणेकरून त्यांचे समस्त आयुष्य आळशीपणा आणि नग्नतेमध्ये जाऊ शकले." असा लावल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला.


द्विपक्षीय संबंधांवर परिणाम नाही...
हा पुतळा हटवण्यासाठी केवळ घाणाच नव्हे, तर आफ्रिकेतील विविध विद्यापीठांमध्ये ऑनलाइन कॅम्पेन सुरू झाले होते. लेगॉन विद्यापीठातून मंगळवारी रात्री गांधींचा पुतळा हटवण्यात आला. येथील विद्यार्थ्यांनी हा आपल्या आत्मसन्मानाचा मोठा विजय असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, घाणाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर आपली प्रतिक्रिया देताना हा विद्यापीठातील अंतर्गत विषय आहे. त्याचा परराष्ट्र धोरणांशी काहीही संबंध नाही असे सांगितले. सोबतच, या घटनेनंतर भारत आणि घाणाच्या परराष्ट्र संबंधांवर सुद्धा काहीच परिणाम होणार नाही असेही स्पष्ट केले आहे.Statue of Mahatma Gandhi removed from Ghana university campus calling him racist

Post a Comment

 
Top