असाही उर्मटपणा विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर बोडना जि. प. शाळेतील मुख्याध्यापकांचे बेताल उत्तर
अमरावती- 'तुमचे आई-वडील व तुम्ही घरी कोंबड्या, बकऱ्या खाता. त्यात हाडेही असतात. शाळेतील आहारात सोंडे, अळ्या निघाल्या तर काय बिघडले? त्यात तर हाडेही नाहीत', असे उर्मट उत्तर बोडना जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुनील विधाते यांनी दिले. पोषण आहारात सोंडे, अळ्या असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली हाेती. दरम्यान, या प्रकरणाच्या चाैकशीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती नेमली हाेती. त्यांनी अापला अहवाल सादर केला.
बोडना जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना मागील सहा दिवसांपासून सोंडे व अळ्या असलेला भात पोषण आहारात वाढला जात असल्याचा खळबळजनक प्रकार १० डिसेंंबर रोजी उघडकीस आला. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना माहिती दिली. त्यानंतर ही माहिती गावात पसरली. गावकऱ्यांसह पालकांनी मुख्यध्यापक विधाते यांना जाब विचारला असता त्यांनी सारवा सारव केली. नंतर याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी या प्रकरणी तीन सदस्यीय चाैकशी समिती नेमून त्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
शासन एकीकडे विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य मिळावे म्हणून पोषण आहारासह इतर पोषक द्रव्ये असलेले अन्न पदार्थ पुरवित असते. मात्र हा आहार खरेच पोषक आणि विद्यार्थ्यांना खाण्यालायक असतो काय? याची शहानिशा संबंधित यंत्रणेकडून केली जात नाही. त्यामुळेच असे प्रकार चव्हाट्यावर येत असतात. आहार पाठवून मोकळे झाले की आपले काम संपले, असे यंत्रणेला वाटते. मात्र तो खरेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो काय? व्यवस्थित वाढला जातो काय? त्याचे नेमके काय होते, असे एक ना अनेक प्रश्न बोडना गावातील पालकांसह गावकऱ्यांनी विचारून पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्यांना चपराकच दिली
मुख्याध्यापकांकडून पालकांपुढे क्षमायाचना :
विद्यार्थ्यांपुढे पोषण आहारातील अळ्यांबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर बोडनावासी, पालक संतप्त झाले. ते बघता मुख्याध्यापकांनी पालक सभा बोलावून क्षमायाचना केली. सोबतच चूक झाल्याचेही कबुल केले. हे प्रकरण अंगावर शेकणार याची खात्री पटल्यामुळे मुख्याध्यापकांनी नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पालक व गावकऱ्यांनी तीन सदस्यीय समितीसोबत बोलताना दिली.
शिक्षणाधिकाऱ्यांकडे दंडाचा अधिकार :
पोषण आहारातील सोंडे, अळ्या प्रकरणी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे चौकशी समितीने अहवाल सादर केला असून अंतिम अहवाल शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांच्याकडे सादर करणार आहेत. शिक्षणाधिकारीच या प्रकरणी दोषी मुख्याध्यापकांना कोणत्या स्वरुपाचा दंड करायचा याचा निर्णय घेतील. तत्पूर्वी ते ही बाब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याही कानावर घालणार आहेत. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी या दोषी मुख्याध्यापकावर काय कारवाई करतात., याकडे लक्ष लागून आहे. मुख्याध्यापकाच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
समितीपुढे मुख्याध्यापकांची कबुली
चाैकशी समितीने तीन दिवसांत अहवाल तयार करून १३ डिसेंबर रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर दिला. त्यात विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे अाणि स्वाक्षऱ्या अाहेत. तसेच मुख्याध्यापकांचा बेताल वक्तव्याबाबत कबुली जबाब अाहे. पोषण आहारात अळ्या दिळाल्याचे पुरावे त्यात सादर केले. हा अंतिम अहवाल गट शिक्षणाधिकारी जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करणार असून मुख्याध्यापकांना कोणती शिक्षा द्यायची याचा निर्णय ते घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत शाळेचे मुख्याध्यापकच कसे बेजबाबदार असतात हेच या प्रकरणावरून लक्षात अाल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.
चौकशी समितीकडून पोषण आहाराचीही तपासणी
शालेय पोषण अाहार अधीक्षक विलास ठाकरे, विस्तार अधिकारी शोभा मालबे, केंद्रप्रमुख तानोडकर यांच्या तीन सदस्यीय समितीने शाळेला पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहारातील तांदळाची तपासणी केली. त्यावेळी त्यात सोंडे, अळ्या आढळल्या. त्यामुळे समिती सदस्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छ, आरोग्यदायी आहार वाढण्याची ताकीद दिली.
मुख्याध्यापक दोषी, मुलांपुढे बेताल वागले
बोडना जयेथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक या प्रकरणी दोषी आहेत. ते बेतालपणे वागले. त्यांनी गंभीरपणे त्यांच्या कर्तव्याचे पालन केले नाही. विद्यार्थ्यांपुढे जबाबदार व्यक्तिने असभ्य बोलणे चुकीचे आहे. गणेश बोपटे, गटशिक्षणाधिकारी
विद्यार्थ्यांनीच दिली चौकशी समितीला माहिती
शाळेतील पोषण आहारात गेल्या सहा दिवसांपासून सोंडे व अळ्या निघत असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना सांगितले. पालकांमुळे मग ही बाब बोडना गावाला कळली. नंतर पालकांनी सोंडे, अळ्या असलेले अन्न खाऊ नका, असे मुलांना समजावले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. यानंतर मुख्याध्यापकांनी कसे उर्मट दिले. याची माहितीही चौकशी समितीला विद्यार्थ्यांनी दिली. चौकशी समितीने विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे बयान नोंदवून त्यावर स्वाक्षरी घेतली व अहवाल तयार करून तो गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला.

Post a Comment