0
दत्ताची उपासना तीन प्रकारे करता येते.

मार्गशीर्ष पौर्णिमा (22 डिसेंबर) शनिवारी श्रीदत्त जयंती साजरी होत आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी भगवान दत्तात्रयचा जन्म झाला होता. श्रीदत्तात्रयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा-विष्णू-महेश अशा स्वरूपाचे आहे. सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण, तसेच या गुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त होत. निर्मिती-पालन-संहार हे त्यांचे कार्य होय. देव आणि मुनिवर त्यांचे ध्यान करतात. दत्ताची उपासना तीन प्रकारे करता येते. गायत्री मंत्र वा गुरुमंत्राचे स्मरण, श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सेवेतून ही उपासना होते.

या दिवशी श्रीदत्ताची विशेष पूजा केली जाते. पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...


पूजन विधी -
सर्वात पहिले श्रीदत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करा. त्यानंतर श्रीदत्ताचे आवाहन करा. त्यानंतर एक तांब्याभर पाणी जवळ ठेवा. उजव्या हातामध्ये एक फुल आणि थोड्या अक्षदा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करा...

ऊँ अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:, श्री दत्त परमात्मा देवता:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:।

त्यानंतर फुल आणि अक्षता श्रीदत्ताच्या प्रतिमेवर अर्पण करा. त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा उच्चार करा...

जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम।
सर्व रोग हरं देव, दत्तात्रेयमहं भज॥

त्यानंतर श्रीदत्ताची आरती करून खालील स्तोत्राचे पाठ करा...

जगदुत्पति कत्र्रै च स्थिति संहार हेतवे।
भव पाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
जराजन्म विनाशाय देह शुद्धि कराय च।
दिगम्बर दयामूर्ति दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
कर्पूरकान्ति देहाय ब्रह्ममूर्तिधराय च।
वेदशास्त्रं परिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
ह्रस्व दीर्घ कृशस्थूलं नामगोत्रा विवर्जित।
पंचभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यशरूपाय तथा च वै।
यज्ञ प्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु: अन्ते देव: सदाशिव:।
मूर्तिमय स्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
भोगलयाय भोगाय भोग योग्याय धारिणे।
जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
दिगम्बराय दिव्याय दिव्यरूप धराय च।
सदोदित प्रब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
जम्बूद्वीपे महाक्षेत्रे मातापुर निवासिने।
जयमान सता देवं दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
भिक्षाटनं गृहे ग्रामं पात्रं हेममयं करे।
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वक्त्रो चाकाश भूतले।
प्रज्ञानधन बोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
अवधूत सदानन्द परब्रह्म स्वरूपिणे।
विदेह देह रूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
सत्यरूप सदाचार सत्यधर्म परायण।
सत्याश्रम परोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
शूल हस्ताय गदापाणे वनमाला सुकंधर।
यज्ञसूत्रधर ब्रह्मान दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
क्षराक्षरस्वरूपाय परात्पर पराय च।
दत्तमुक्ति परस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
दत्तविद्याठ्य लक्ष्मीशं दत्तस्वात्म स्वरूपिणे।
गुणनिर्गुण रूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
शत्रु नाश करं स्तोत्रं ज्ञान विज्ञान दायकम।
सर्वपाप शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते॥

पाठ झाल्यानंतर खालील मंत्राचा एक माळ जप करा.
ऊँ द्रां दत्तात्रेयाय नम:lord dattatray jayanti tomorrow 22 December

Post a Comment

 
Top