0

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजप पुन्हा आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतमोजणीच्या अखेरच्या फेऱ्यांमध्ये नेमके कसे चित्र समोर येते यावर आता मध्यप्रदेशचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

मध्यप्रदेश - असे आहेत निकाल
पक्ष
आघाडी
निकाल
2013 ची स्थिती
भाजप 104 0 165
काँग्रेस 115 0 58
इतर 11 0 7
एकूण 230/230 0 230
शिवराज यांची नेत्यांशी चर्चा

दरम्यान, मध्य प्रदेशातील सद्यस्थिती पाहता काँग्रेस आणि भाजप यांच्यात अगदी थोडा फरक राहणार असे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भाजप नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. चौहान यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे. त्यात सत्तास्थेपनेच्या शक्यतांवर चर्चा केली जात आहे.

कोण काय म्हणाले..

दिग्विजय सिंह

पूर्ण निकाल येईपर्यंत काहीही बोलणे घाईचे ठरेल पण मध्यप्रदेशात काँग्रेस पूर्ण बहुमताची सत्ता स्थापन करणार हे निश्चित आहे.

कमलनाथ यांच्या घरी बैठक सुरू

दरम्यान, मध्यप्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या घरी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांचीही उपस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.

असे होते मध्यप्रदेशचे एक्झिट पोलचे अंदाज

मध्यप्रदेशात 230 जागा आहेत. 28 नोव्हेंबरला झालेल्या मतदानात 75 टक्के मतदारांनी मतदान केले. 2013 मध्ये भाजपने 165 आणि काँग्रेसने 58 जागा जिंकल्या होत्या.

सर्वे भाजप काँग्रेस इतर
अॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे 102-122 104-122 4-11
टाइम्स नाऊ-सीएनएक्स 126 89 15
एबीपी-लोकनिती 94 126 10
इंडिया न्यूज-नेता 106 112 12
रिपब्लिक 108-128 95-115 7
न्यूज नेशन 110 107 13

- भाजपने मध्यप्रदेशात आतापर्यंत 5 वेळा सत्ता स्थापन केली आहे.
- शिवराज मध्य प्रदेशातील सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत.
- शिवराज सिंह चौहान 13 वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर 15 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे.
- राज्यात यावेळी विक्रमी 75% मतदान झाले आहे.

3 मुद्द्यांमुळे चर्चेत राहिली निवडणूक

व्यापमं घोटाळा : या घोटाळ्यावरून शिवराज सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लागले आहेत.
शेतकरी आंदोलन : गेल्यावर्षी जूनमध्ये मंदसौरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात 6 जण ठार झाले होते. राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांनी राज्याचा दौरा करून शिवराज सरकारला शेतकरी विरोधी ठरवले होते.
टेम्पल रन : राज्यातील 109 जागांवर 8 धार्मिक स्थळांचा प्रभाव आहे. त्यासाठी नेत्यांनी मंदिरांचेही दौरे केले. अमित शहा उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेले. तर राहुल गांधींनी चित्रकूटमध्ये कामतानाथ मंदिरात दर्शन घतलेLive News and Updates of Madhya Pradesh Assembly Result 2018

Post a Comment

 
Top