0
राफेल करारावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल घटनाविरोधी असल्याचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी म्हटले आहे. घटनेच्या कलम ११२ ते ११७ नुसार सरकार खर्च करत असलेल्या प्रत्येक रुपयाला संसदीय मान्यता आवश्यक आहे, इतकेच नव्हे, तर आधुनिक लोकशाहीचे ते मुलभूत तत्व आहे, असे काटजू यांनी फेसबुक पोस्टवर राफेल निकालावर मत व्यक्त करताना म्हटले आहे.

काटजू म्हणाले की, राफेल विमानांच्या किमती हा संवेदनशील मुद्दा असल्याने त्या संसदेत उघड करण्याची गरज नाही, हे पुर्णतः घटनाविरोधी आहे. जर न्यायालयाचा निर्णय मान्य केला, तर सरकारचा प्रत्येक करार सरळ संवेदनशील ठरवण्यात येईल. करार संवेदनशील असेल किंवा नसेल, पण सरकार खर्च करत असलेल्या प्रत्येक रुपयाची माहिती संसदेला दिली पाहिजे आणि त्याला मान्यता सुद्धा घेतली पाहिजे.

सर्वोच्‍च न्यायालयाने काल राफेल खरेदी प्रकरणात कोणत्याही त्रुटी नसल्याचे म्हटले होते. तसेच हस्‍तक्षेप करण्यास नकार देत राफेल कराराच्या विरोधातील सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या. तसेच करारावरून केंद्र सरकारवर शंका उपस्‍थित करणे चुकीचे असल्याचा निष्‍कर्ष सर्वोच्‍च न्यायालयाने नोंदवला होता. 

Post a Comment

 
Top