0
यात विरोधी पक्षांच्या आघाडीला फक्त 7 जागा मिळाल्या आहेत.

ढाका - बांग्लादेशच्या पंतप्रधान पदी चौथ्यांदा शेख हसीना यांची निवड होत आहे. आवामी लीगने रविवारी बांग्लादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवले. हसीना यांच्या पक्षाने 300 पैकी तब्बल 260 जागा काबीज केल्या आहेत. तर आवामी लीगचा मुख्य सहकारी पक्ष जतिया पार्टीने सुद्धा 21 जागा मिळवल्या. वनडे टीमचा कर्णधार कॅप्टन मशरफे मुर्तझाने सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या तिकीटावर ही निवडणूक जिंकली आहे. तर दुसरीकडे, मुख्य विरोधी पक्ष नॅशनल युनिटी फ्रंट (एनयूएफ) आणि सहकाऱ्यांना फक्त 7 जागांवर समाधान मानावे लागले.

हिंसाचारात 17 जणांचा मृत्यू, फेरफारचे आरोप
संसदीय निवडणुकीत अनेक ठिकाणी हिंसाराच्या घटना घडल्या. त्यामध्ये पोलिस आणि सैनिकांसह एकूणच 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोबतच, विरोधी पक्षांनी आपल्या पराभवानंतर हसीना यांच्या पक्षावर फेरफार केल्याचा आरोप लावला. तसेच पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली. 300 जांगांपैकी 299 जागांचे निकाल लागले. तर एका ठिकाणी उमेदवाराच्या निधनानंतर निवडणूक पुढे ढकलण्यात आली.

ढाका - बांग्लादेशच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा शेख हसीना यांची निवड होत आहे. आवामी लीगने रविवारी बांग्लादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसऱ्या वेळी बहुमत मिळवले. हसीना यांच्या पक्षाने 300 पैकी तब्बल 260 जागा काबीज केल्या आहेत. तर आवामी लीगचा मुख्य सहकारी पक्ष जतिया पार्टीने सुद्धा 21 जागा मिळवल्या. वनडे टीमचा कर्णधार कॅप्टन मशरफे मुर्तझाने सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या तिकीटावर ही निवडणूक जिंकली आहे. तर दुसरीकडे, मुख्य विरोधी पक्ष नॅशनल युनिटी फ्रंट (एनयूएफ) आणि सहकाऱ्यांना फक्त 7 जागांवर समाधान मानावे लागले.


हिंसाचारात 17 जणांचा मृत्यू
संसदीय निवडणुकीत अनेक ठिकाणी हिंसाराच्या घटना घडल्या. त्यामध्ये पोलिस आणि सैनिकांसह एकूणच 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोबतच, विरोधी पक्षांनी आपल्या पराभवानंतर हसीना यांच्या पक्षावर फेरफार केल्याचा आरोप लावला. तसेच पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली. 300 जांगांपैकी 299 जागांचे निकाल लागले. तर एका ठिकाणी उमेदवाराच्या निधनानंतर निवडणूक पुढे ढकलण्यात आली.

नव्याने मतदान घेण्याची मागणी
बांग्लादेश निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, हसीना दक्षिण-पश्चिम गोपालगंज जागेवरून विजयी झाल्या. त्यांना 2,29,539 मते मिळाली. तर त्यांच्या सर्वात जवळचा प्रतिस्पर्धीला फक्त 123 मते मिळाली आहेत. एनयूएफ आघाडीत बीएनपी, गोनो फोरम, जतिया समाजवादी पार्टी, नागोरिक ओकाया आणि कृषक श्रमिक जनता लीग इत्यादींचा समावेश आहे. एनयूएफचे संयोजक कमल हुसैन यांनी निवडणुकीचे निकाल स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. सर्वच ठिकाणी मतदानात घोटाळेबाजी झाली असा आरोप त्यांनी लावला. सोबतच, निकाल रद्द करून नव्याने मतदान घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
Sheikh Hasina wins Bangladesh general elections fourth time

Post a Comment

 
Top