'रातभोर' या १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
- नवी दिल्ली- भारतीय चित्रपट क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मृणाल सेन (९५) यांचे रविवारी निधन झाले. २००५ मध्ये त्यांना फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.१४ मे १९२३ रोजी फरीदपूरमध्ये सेन यांचा जन्म झाला. 'रातभोर' या १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९६० मध्ये प्रदर्शित 'नील आकाशेर नीचे' या चित्रपटामुळे मृणाल सेन यांची दिग्दर्शनाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली. 'बाइशे श्रावण'मुळे त्यांचे नाव जागतिक पातळीवर गाजले. सेन यांचे सर्वाधिक चित्रपट बांगला भाषेत आहेत. मिथुन चक्रवर्तीच्या पहिल्या 'मृगया' चित्रपटाचे दिग्दर्शन सेन यांनी केले होते. सेन यांना २० राष्ट्रीय, १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००२ मध्ये ८० व्या वर्षी सेन यांनी 'आमार भुवन' या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
Post a Comment