0
येथील पूजा योगेश कोलते (वय 27) या विवाहीतेने राहत्या घरी गळफास लावून घेवून आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
    घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पूजा हिचा चार वर्षापूर्वी योगेश याच्याशी विवाह झाला होता. पती योगेश येथील एका पत संस्थेत पिग्मी एजन्ट आहे. तर सासू काळजवडे येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सासू रेखा कामानिमित्त काळजवडे येथील अंगणवाडीत गेल्या होत्या. तर पती योगेश परगावी गेले होते. यावेळी पूजा ही मुलगी तेजस्वीनीसोबत घरी होती. यावेळी पूजाने घराच्या छताला असणाऱया लोखंडी हुकाला दोरी बांधून घळफास लावून घेतला. आई निपचित पडल्याचे पाहून मुलगी तेजस्वीनीने हंबरडा फोडला. तिच्या रडण्याने शेजारी जमा झाले. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता. पूजाने आत्महत्या केल्याचे समजून आले. शेजाऱयांनीच सासू रेखा व पती योगेश यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
        दरम्यान दुपारी कळे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रूग्णालयात पाठविला. पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, सहाय्यक फौजदार सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

 
Top