0
दुबईवरुन लखनऊकडे येणाऱ्या विमानातील एका ३५ वर्षीय प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे काढले. ही घटना शनिवारी घडली. विमानातील स्टाफने प्रसंगावधान राखून त्याला लगेच एका ब्लँकेटमध्ये गुंडाळे. पण, या प्रकाराने विमानातील इतर प्रवाशांना धक्का बसला. एअर इंडियाच्या (IX-194) या विमानाने दुबईहून लखनऊसाठी उड्डाण केले. या विमानातील सुरेंद्र नावाच्या ३५ वर्षीय प्रवाशाने विमानातील लॉबीत येत आपले कपडे काढले. त्यानंतर तो लॉबीत फिरायला लागला. या कृत्याने बाकीच्या प्रवाशांना धक्का बसला. विमानातील स्टाफने लगेचच सुरेंद्रला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळले. सुरेंद्रने असे का केले याचे कारण काही समजू शकले नाही. पण, एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सुरेंद्रवर दुबईत स्थित असलेल्या पाकिस्तानी मालकाने त्याचा वरचेवर छळ केल्याने त्याला मानसिक धक्का बसल्याचे सांगितले.

विमान लखनऊच्या विमानतळावर लँड झाल्यावर सुरेंद्रला सेंट्रल इंडस्टियल सिक्युरीटी फोर्सने चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रने त्याचा पाकिस्तानी मालक त्याचा वरचेवर छळ करत होता. तसेच त्याला सुट्टीही देत नव्हता. सुरेंद्रला वाटले की विमान पाकिस्तानात लँड झाले आहे. त्यामुळे त्याने याचा विरोध दर्शवण्यासाठी आपले कपडे काढले असे सांगितले.  

Post a Comment

 
Top