0
कसाल एस. टी. बस स्टँडवर बसमध्ये चढताना अनुसया अनंत गावडे (75) यांच्या गळय़ातील दोन तोळे सोन्याची माळ अज्ञात चोरटय़ाने लंपास केली.
कसाल येथे गुरुवारचा आठवडा बाजार करून घरी परतण्यासाठी अनुसया गावडे या वायंगवडे बसमध्ये चढल्या. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटय़ाने गावडे यांच्या गळय़ातील सोन्याची माळ लंपास केली. गळय़ातील माळ लंपास झाल्याचे लक्षात येताच गावडे यांनी ही घटना सोबतच्या प्रवाशांना दिली.
बस चालक प्रकाश परब व वाहक होळकर यांनी घटनेची माहिती कसाल पोलीस ठाण्यात दिली. पोलीस कर्मचारी आशिष शेलटकर हे तातडीने घटना स्थळी दाखल झाले. शेलटकर यांनी प्रवाशांच्या साहित्यासह बसची पाहणी केली. मात्र, माळ सापडली नाही. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top