0
मुंबई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ७२ हजार पदांच्या भरतीला स्थगिती देण्याची मागणी बुधवारी धनगर समाजाने केली आहे. आधी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले द्या, त्यानंतरच कोणत्याही प्रकारची भरती करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी विरोधी बाकावरील देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण मंजूर होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात आली होती. मराठा समाजानंतर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या धनगर समाजाची आहे. त्यांना एसटी प्रवर्गाचे दाखले मिळाल्यास सुमारे दीड कोटी बांधवांना फायदा होईल. त्यासाठी आधी मेगाभरतीला स्थगिती द्या, अशी मागणी गडदे यांनी केली
.Mega Bhabarite protests against Dhangar community | मेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध

Post a Comment

 
Top