0
मुंबईत बैठक घेऊन ठरवणार पुढील भूमिका

नाशिक - शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून स्वतःचे नुकसान करण्यापेक्षा राज्यकर्त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत कांदे मारा. तोच कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावा. तेव्हाच बेशुद्ध झालेल्या सरकारला शुद्ध येईल, असा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना केले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भाजप सरकारकडून होणारी अवहेलना लक्षात घेता राज यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करायला नाशिकमधून सुरुवात केली आहे. बुधवारी कळवण दौऱ्यादरम्यान राज यांनी शेतकऱ्यांना धीर देत कांद्याच्या प्रश्नावर आगामी आठवड्यात मुंबईत येण्याचे अावाहन केले. मी आपल्या सोबतीने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारेल, असे सांगितले. कांद्याला हमीभाव व नुकसान झालेल्या कांद्याला अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. व्यापाऱ्यांसमवेत चर्चा करताना महत्त्वाची कार्यालये कळवणमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू. असेे सांगितले. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी व पर्यटनस्थळाच्या निर्मितीसाठी आपण आग्रही असून छत्रपतींच्या इतिहासाचे जतन करण्यासाठी गडकिल्ले सुरक्षा मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी दीपक हिरे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करावी. समितीची मुंबईत बैठक घेण्याचे डॉ. प्रदीप पवार यांना सांगितले. औद्योगिक वसाहतीचे रूपांतर सरकारी वसाहतीत होऊन रोजगारनिर्मिती वाढावी यासाठी सुनील देवरे यांनी दिलेल्या निवेदनावर त्यांनी वसाहतीच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सुरू करण्यासाठी भेटलेल्या शिष्टमंडळाला ठाकरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून पोहाेच माझ्याकडे पाठवा. मग एकेकाच्या कामाचे स्कॅन करतो, असे सांगितले.

मुंबईत बैठक घेऊन ठरवणार पुढील भूमिका
कळवण दौऱ्यात भेटलेल्या शेतकरी, व्यापारी, विविध सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाला राज ठाकरे यांनी पुढील आठवड्यात मुंबईत पाचारण केले अाहे. मुंबईत संयुक्त बैठक घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून आगामी भूमिका ठरविण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरे यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे.

Post a comment

 
Top