0
भारतीय तपास संस्था त्रास देत असून आपल्याविरुद्धचा खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा चोकसीचा आरोपही इंटरपोलने फेटाळला

  • नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप असलेला हिरा व्यापारी मेहुल चोकसीविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. भारतीय तपास संस्था त्रास देत असून आपल्याविरुद्धचा खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा चोकसीचा आरोपही इंटरपोलने फेटाळला आहे. चोकसीने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या सीबीआयच्या अर्जाविरुद्ध अपील केले होते.

    सूत्रांनी सांगितले की, रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यानंतर चोकसीपर्यंत पोहोचणे भारतीय संस्थांसाठी सोपे हाेईल. हे प्रकरण इंटरपोल समितीच्या पाचसदस्यीय कोर्टाकडे गेले होते. चोकसीचा आरोप आहे की, आपल्याविरुद्धचा खटला हा राजकीय कटाचा भाग आहे. त्याने भारतातील तुरुंगांची स्थिती, खासगी सुरक्षा आणि आरोग्यासारख्या मुद्द्यांवरही अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत.
    काय आहे रेड कॉर्नर नोटीस? 
    रेड कॉर्नर नोटीस ही फरार गुन्हेगारांसाठी एक प्रकारचे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट असते. त्यात इंटरपोल आपल्या सदस्य देशांना या गुन्हेगारांना अटक किंवा ताब्यात घेण्याची विनंती करते.'Red Corner' notice issued against Mehul Chokseeir by Interpol

Post a comment

 
Top