0
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली होती.

मुंबई- मुंबईहून दिल्लीमार्गे लखनऊला जाणारे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने शनिवारी चांगलीच खळबळ उडाली. परिणामी छत्रपती ‍शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे रोखण्यात आली आहे.

सूत्रोंनी सांगितले की, विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली होती. बीटीएसीने धमकीनंतर विमान रिकाम्या जागेवर नेण्यात आले . सुरक्षा एजन्सीच्या अधिकार्‍यांनी विमानात तपासणी केली. परंतु कोणताही बॉम्ब आढळून आला नाही.

या घटनेबाबत इंडिगो एअरलाइन्सने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. विमान सकाळी 6 वाजून 5 मिनिटाला उड्डाण करणार होती. परंतु विमानात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, इंडिगो विमान जी8 329 ने दिल्लीला जाणारी एक महिला प्रवाशी इंडिगोच्या चेक-इन काऊंटरवर आली. तिने सांगितले की, इंडिगोचे विमान 6 ई 3612 मध्ये बॉम्ब आहे. अशीही माहिती समोर आली आहे. या महिलेचे काही फोटो सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे.
indigo security received a bomb threat call at mumbai airport

Post a comment

 
Top