0
मुंबई : 'देसी गर्ल' म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा परदेशी प्रियकर म्हणजेच निक जोनास आता विवाहबंधनात अडकले आहेत. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही विवाहपद्धतींनुसार त्यांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसोहळ्याचे फोटो प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेएरही केले. ज्यानंतर बऱ्याच चर्चांना, विनोदांना आणि मुख्य म्हणजे मीम्सना उधाण आलं. 
प्रियांकाने तिच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो शेअर केले, ज्या फोटोंमध्ये एक काकू मोठ्या उत्साहात ओरडताना दिसत आहेत. अर्थात फोटोतील इतर मंडळीसुद्धा उत्साहात आहेत, पण काकूंना काही तोड नाही. 
आता या काकूंचे हेच हावभाव नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन गेली आहे. परिणामी धम्माल विनोदी मीम्सची गर्दी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चला तर मग नजर टाकूया अशाच काही विनोदी मीम्सवर...

Post a Comment

 
Top