0
बंटीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय .

परतवाडा- स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सुशील ऊर्फ बंटी मारोतराव दुर्गे (वय ३४, रा. रवी नगर, गौरखेडा कुंभी) या युवकाने गुरुवार, २७ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रविनगर येथील मारोतराव दुर्गे डाक विभागातून सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा मुलगा बंटी उर्फ सुशिल दुर्गे यांचे बी.ए.,बी.एड. पर्यंत शिक्षण झाले. मागील अनेक दिवसांपासून बंटी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो सतत अभ्यासात राहून नोकरीच्या संधीची वाट पाहत होता असे शेजारच्या नागरिकांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास घरातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बंटीने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा परिसरात होती. परतवाडा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. बंटीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Suicide case in Amravati

Post a Comment

 
Top