0
नीलेश मस्के ठार झाला असून बुटले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे

आर्णी - यवतमाळच्या आर्णीमधील ग्रामीण रुग्णालय परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दुपारी पाऊणे दोनच्या सुमारास नीलेश मस्के यांच्यावर हा हल्ला झाला. हल्ला थांबवण्यासाठी गेलेले अमित बुटले यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला चढवला. यात नीलेश मस्के ठार झाला असून बुटले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

नीलेश मस्के हा पूर्वी शिवसेना कार्यकर्ता होता. युवासेनेच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यानंतर मस्के यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते भाजपमध्ये कार्यरत होते. दुपारी पाऊणे दोन वाजेच्या सुमारास बुलेटवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी नीलेश मस्केवर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. नीलेश यांचा मित्र अमित बुटले हल्ला थांबविण्यासाठी गेला होता. पण हल्लोखोरांनी बुटले यांच्या पोटातही गुप्ती खुपसली. त्यामुळे तेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल केले. पण नीलेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बुटले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
Attack on BJP Worker in Arni of Yavatmal

Post a comment

 
Top