0
कामांची चर्चा - स्मार्ट पळवापळवीवर राज ठाकरेंचा टाेला

 • नाशिक : अठरा महिन्यानंतरही दत्तक नाशिक घेणारा बाप काेठे, असा सवाल नाशिककरांना अाहे. मनसेने केेलेल्या कामांची अाता चर्चा हाेत असली, तरी हे प्रकल्प पळवून स्मार्ट सिटीत नेणाऱ्या भाजपला जितके महत्त्व कळले तितके नाशिककरांना नाही, याची खंत असल्याचा टाेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. ग्रामीण भागातील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर समाधानी असलेल्या राज यांनी नाशिकवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचेही संकेत दिले.

  पाच दिवसांच्या दाैऱ्याची सांगता करताना राज यांनी समाधानी असल्याचे मत व्यक्त केले. या पाच दिवसांत लाेकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त हाेता. हे काही आभासी नसून लाेकांचा प्रतिसाद तुमच्या-आमच्या कॅमेरा, माेबाइलमध्ये कैद झाला अाहे. लाेकांच्या मनात भाजप-शिवसेना सरकारविषयीचा राग वाढला आहे. त्यांचे प्रश्न सुटलेले तर नाहीच मात्र समस्यांचा डाेंगर वाढत चालला अाहे. ग्रामीण भागातील दाैऱ्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न लक्षात अाले असून पुढील दाैऱ्यात नक्कीच उर्वरित तालुक्यांमध्ये जाऊनही आढावा घेतला जाईल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

  जानेवारीत पुन्हा तळ ठाेकणार :
  या दाैऱ्यातील प्रतिसादानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा नाशिकला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकसाठी अधिकाधिक वेळ देऊन बालेकिल्ल्यावरील पकड पुन्हा मजबूत करण्याचे संकेतही त्यांनी दिले. मनसेच्या प्रतिकुल काळात पक्षासाेबत खंबीरपणे उभे असलेले प्रदेश सरचिटणीस अशाेक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, डाॅ. प्रदीप पवार यांना राज यांनी शेजारी मानाचे स्थान दिले हाेते.

  ढिकले यांच्या घरी आघाडीची माेट :
  राज ठाकरे यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर राहुल ढिकले यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीप्रसंगी राष्ट्रवादीसाेबतच्या गटात महापालिकेत असलेले माजी उपमहापाैर गुरुमित बग्गा तसेच काँग्रेसचे पालिकेतील गटनेते शाहू खैरे हेही उपस्थित हाेते. अागामी महाअाघाडीच्या पार्श्वभूमीवर दाेन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बरेच काही सांगून गेली.

  नाशिक लाेकसभाही मनसेच्या रडारवर 
  काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत मनसे महाअाघाडीत जाणार अशी चर्चा सुरू अाहे. त्याबाबत राज यांनी तूर्तास इन्कार केला असला तरी, स्पष्टपणे नकारही दिला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, राज यांचा फाेकस विधानसभा निवडणुकीवरच अधिक असेल मात्र, लाेकसभा निवडणुकीतून वातावरणनिर्मितीचाही प्रयत्न अाहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर किंवा अन्य लाेकसभा मतदारसंघात किंबहुना नाशिक लाेकसभा मतदारसंघावरही मनसेकडून दावा सांगितला जाऊ शकताे.

  सध्या ही जागा राष्ट्रवादीकडे असून या ठिकाणावरून माजी खासदार समीर भुजबळ यांची तयारी सुरू अाहे. या ठिकाणी मनसेकडून दावा झाल्यास शिवसेनेविरुद्ध सरळ लढत हाेऊ शकते. २००९ मधील निवडणुकीत मनसेने मारलेल्या मुसंडीची अाठवण करून दिली जात असून, तसे झाल्यास डाॅ. प्रदीप पवार यांना पुन्हा एकदा निवडणुकीत उतरवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. पवार यांनी पराभवानंतरही मनसेला समर्थपणे साथ दिली असून, तळापर्यंतच्या कार्यकर्त्यांशी त्याचा संपर्क अाजही टिकून अाहे. अर्थात पवार हे त्यासाठी राजी हाेतील की नाही याबाबत सध्यातरी दुजाेरा मिळालेला नाही. Raj Thackeray Nasik Tour

Post a Comment

 
Top