0
अपघातानंतर 5 जणांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. तर दोन जण यात गंभीर जखमी आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्यातील खेड - दापोली मार्गावर नारपोलीजवळ पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. शुक्रवारी सकाळी या मार्गावरूल मॅक्सिमो गाडीला समोरून येणाऱ्या भरधाव बंपरने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, अपघातानंतर 5 जणांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. तर दोन जण यात गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
5 died on the spot in accident in Ratnagiri of Maharashtra

Post a Comment

 
Top