0
चाणक्य नीती : पिठापेक्षा दहापट जास्त बळ असते दुधामध्ये, दुधापेक्षा जास्त बळ खाण्याच्या कोणत्या पदार्थामध्ये असते?

निरोगी शरीरासाठी विविध प्रकारचे अन्न, दुध, भाज्या, तूप इ. गोष्टींचा आहारात समावेश केला जातो. या पदार्थांपासून शरीराला भरपूर प्रमाणात उर्जा प्राप्त होते आणि आपण काम करत राहतो. आहारातील प्रत्येक पदार्थापासून मिळणाऱ्या उर्जेचे प्रमाण वेगवेगळे राहते. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, खाण्याच्या कोणत्या खास पदार्थामध्ये किती बळ असते आणि कोणते पदार्थ खाल्ल्याने शरीराला काय लाभ होतो...


आचार्य चाणक्य सांगतात की -
अन्नाद्दशगुणं पिष्टं पिष्टाद्दशगुणं पय:।
पयसोथऽष्टगुणं मांसं मांसाद्दशगुणं घृतम्।।


या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की, आपल्या शरीरासाठी अखंड अन्नामध्ये खूप बळ असते, परंतु त्यापेक्षा दहापट जास्त बळ त्याच्या पिठामध्ये असते. पिठापासून तयार केलेली पोळी, भाकरी पचवणे आपल्या पचनतंत्राला सहज शक्य होते. यामुळे पिठापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांपासून शरीर जास्त उर्जा ग्रहण करू शकते. ही उर्जा व्यक्तीला दिवसभर काम करण्यास सज्ज ठेवते.


पिठापेक्षा दहापट जास्त बळ असते दुधामध्ये
या नीतीनुसार पिठापेक्षा दहापट जास्त बळ दुधामध्ये असते. म्हशीच्या दुधापेक्षा गायीचे दुध जास्त पौष्टिक आणि बळ देणारे आहे. नियमितपणे गायीच्या दुधाचे सेवन केल्यास व्यक्ती विविध आजारांपासून दूर राहू शकतो. गायीच्या दुधामधील विविध पौष्टिक तत्व शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.

Post a Comment

 
Top