0

पोलिस घरामध्ये गेल्यानंतर समोर आले एक धक्कादायक कारण

हार्लेम. कडाक्याच्या थंडीमध्ये सर्व परिसर बर्फाने माखला असेल आणि फक्त एकाच घरावर जराही बर्फ नसेल तर आश्चर्य नक्कीच वाटेल. तीन वर्षांपुर्वी नीदरलँड्समध्ये पोलिसांना असेच काही दिसले. येथे प्रचंड बर्फवृष्टी होत होती, पण एका घराच्या छतावर अजिबात बर्फ नव्हता. पोलिसांना संशय आला. यानंतर त्यांनी घराची तपासणी केली. तेव्हा घरात गांज्याची शेती केली जात असल्याचे समोर आले.

हीट लँम्पमुळे वितळत होता बर्फ 
- हे प्रकरण एम्सटर्डमजवळील हार्लेम शहरातील आहे. येथे प्रचंड बर्फवृष्टी होत असतानाही एका घराच्या छतावर बर्फ जमा होत नाही हे पोलिसांनी पाहिले. 
- पोलिसांना संशय आला तेव्हा त्यांनी घरावर छापा टाकला. तेव्हा घरात हीट लॅम्प असल्यामुळे बर्फ जमा होत नाही असे समोर आले. 
- हे हीट लँम्प्स बिल्डिंगमधील गांज्याच्या झाडांसाठी लावण्यात आले होते. या लॅम्पच्या आधारे कडाक्याच्या थंडीतही 29 डिग्रीपर्यंतचे टेम्प्रेचर मेंटेन केले जात होते. हे गांज्याच्या शेतीसाठी पुरक होते. 
- घरात किती गांज्याचे उत्पादन करण्यात आले. किती प्रमाणात गांजा मिळाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. 
- नीदरलँडमध्ये घरात गांज्याचे पाचपेक्षा जास्त झुडूप लावणे अपराध मानला जातो. यासोबतच कोणताही व्यक्ती 5 ग्रामपेक्षा जास्त गांजा जवळ ठेवू शकत नाही.
पोलिसांना येथून मिळाला होता पुरावा 
- या घटनेच्या काही आठवड्यांपुर्वी ऑफिसरांनी अशाच घटनेच्या आधारे जुतफेन शहराच्या एका ठिकाणी छापा टाकला होता. येथे त्यांना एका घरात गांज्याची शेती मिळाली होती. येथे एका बेडरुममध्ये 88 गांज्याची रोप लावली होती. या घटनेमुळे त्यांना त्या घरावर संशय आला होता.Dutch police catch cannabis growers after spotting snow free roof, case

Post a Comment

 
Top