0
जामनेर तालुक्यातील शेंदूणी येथील नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व १७ नगरसेवकांसाठी मतदान होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत.
५७ उमेदवारांसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. याठिकाणी प्रथमच नगर पंचायत निवडणूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील हा भाग असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शेंदूणी हे गाव पोलिस खात्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आह. गावात अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शेंदूणी ग्रामपंचायत असताना भाजपची सत्ता होती. ती नगरपंचायत झाल्यानंतर पहिली निवडणूक होत आहे, त्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष पदासाठी मुख्य लढत ही भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी  भाजपा उमेदवार विजया अमृत खलसे, राष्ट्रवादी काँग्रेस क्षितीजा गरुड, मनसे संगीत चौधरी, शिवसेना मनीषा विलास बारी  हे रिगणात आहेत.

Post a Comment

 
Top