0
'ठग्ज ऑफ हिंदोस्तांन' च्या अपयशामुळे हैराण आहे कतरिना

एन्टटेन्मेंट डेस्क. दीपिका पदुकोणने रणवीर सिंहसोबत लग्न केले आहे. यापुर्वी तिचे अफेअर रणबीर कपूरसोबत होते. या काळात दीपिका आणि कतरिना चांगल्या मैत्रिणी होत्या. दीपिकानेच रणबीरची कतरिनासोबत भेट घालून दिली होती. पण नंतर रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झाले आणि कतरिना आणि रणबीरचे अफेअर सुरु झाले. यानंतर कतरिना आणि दीपिकामध्ये मतभेद सुरु झाले. पण कतरिना आता दीपिकाच्या लग्नात पोहोचली तर दीपिकाने सोशल मीडियावर कतरिनाला फॉलो करणे सुरु केले. आमच्या वेबसाइटने याविषयी कतरिनाची प्रतिक्रिया घेतली, तेव्हा ती म्हणाली की, असे झाले असेल तर चांगली गोष्ट आहे. कतरिना म्हणाली की, आमच्या नात्याविषयी लोक विविध अंदाज बांधत असतात, पण आम्ही आम्हाला जे योग्य वाटते तेच करतो.

'ठग्ज ऑफ हिंदोस्तांन' च्या अपयशामुळे हैराण 
- 'ठग्ज ऑफ हिंदोस्तांन' चित्रपटाच्या अपयशामुळे कतरिनाही हैराण आहे. कतरिनाने चित्रपटामध्ये काही डान्स नंबर केले होते. ती म्हणते की, या चित्रपटाकडून अशा अपेक्षा अजिबात नव्हत्या."
- कतरिनाला तिच्या या चित्रपटातील छोट्या भूमिकेविषयी विचारण्यात आले, ती म्हणाली की, "हा खुप चांगला प्रश्न आहे. माझ्या पुर्ण करिअरमध्ये मी माझ्यासोबत चित्रपटात 10 लोक आहेत की, 1 आहे याकडे कधीच लग्न दिले नाही. मी फक्त चित्रपटात काय करते आहे यावर मी लक्ष दिले. भूमिकेची लेंथ आणि स्क्रीनटाइमवर मी लक्ष दिले नाही. नेहमी भूमिकेवर लक्ष देते. जर मला वाटले की, यामध्ये काही तरी आहे आणि एक अभिनेत्री म्हणून मी ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारु शकते तर मी ती भूमिका करते. मला वाटले होते की, या सेटअपमध्ये चित्रपट वेगळा असेल. ही एक पिरियर फिल्म होती. हा एक मोठा प्रयोग होता, पण यशस्वी झाला नाही. सिनेमामध्ये अशी जोखिम असतेच."
मी 'भारत' साठी पहिली पसंत नव्हते - कतरिना 
प्रियांका चोप्राने 'भारत' चित्रपट सोडल्यानंतर सलमानने तिच्याऐवजी कतरिनाला घेतले हे सर्वांना माहिती आहे. पण तेव्हा वृत्त होते की, कतरिना चित्रपटाची पहिली चॉइस होती. प्रियांकाने खुप आग्रह केल्यावर सलमानने कतरिनाऐवजी प्रियांकाला घेतले होते. पण कतरिनाला हे वृत्त फेटाळले आहे. ती म्हणते की, या चित्रपटाती पहिली पसंत प्रियांका होती. तिने चित्रपट सोडल्यानंतर मला यामध्ये घेण्यात आले. 
- कतरिना म्हणाली की, "मी डायरेक्टर अली अब्बास यांची पहिली पसंत नव्हते. मी आणि अली चांगले मित्र आहोत."
- भारतसाठी हो का म्हणाली, यावर ती म्हणते की, "अली अब्बास जफर मला म्हणाले की, चित्रपटात बदल झाले आहेत आणि मी त्यांची ओरिजनल चॉइस नाही, पण तरीही मला तुला ही स्क्रिप्ट ऑफर करायची आहे. यामध्ये मैत्री नव्हती. एक प्रोफेशनल कॉल होता आणि मी ओके म्हणाले."
'भारत'चा प्रवास शानदार होता
'भारत'मध्ये सलमानसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी कतरिना म्हणते की, हा एक शानदार प्रवास होता. मी खुप एन्चॉय करतेय. चित्रपटाची शूटिंग दिर्घकाळापासून सुरु आहे. मी खुप काही शिकते आहे. सेटचा एक्सपीरियन्स खुप चांगला आहे.

Post a comment

 
Top