पुणे- गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील एका शाळेत घडली आहे. शाळेत विद्यार्थिनीना मोबाईलवर अश्लील क्लिप दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. गोटेवाडी (ता.तासगाव) जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली असून सहाय्यक शिक्षक उत्तम कांबळे (35, मूळ गाव: विसापूर, ता. तासगाव) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
अश्लील क्लिप दाखवून गैरवर्तन करत होता भामटा..
आरोपी शिक्षक काही विद्यार्थिनींना आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून त्यांच्यासोबत गैरवर्तन करत होता. याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर कांबळे हा फरार होता. पोलीस त्याच्या शोधात होते.
अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर स्वत: हजर झाला पोलिसांसमोर..
आरोपी कांबळे याने जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. शनिवारी रात्री कांबळे हा तासगाव पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्याला तासगाव कोर्टात हजर केले असता 5 दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

Post a Comment