रशियातील हायप्रोफाइल मर्डर करणाऱ्याने सांगितली त्या रात्रीची कथा.
टोम्स्क - रशियाच्या सायबेरीयन शहर टोम्स्कमधील एका भयावह मर्डर केस प्रकरणी एकाला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 30 वर्षांचा अॅलेक्झँडर अल्तापोव्ह 20 वर्षांच्या व्हिक्टोरिया पोव्हेस्मा दोन वेळा बलात्कार आणि हत्या करून शीर कापल्याच्या आरोपात दोषी ठरला. त्याने मर्डरनंतर डेडबॉडीचे लहान-लहान तुकडे करून शहराच्या विविध भागांत लपवले. विशेष म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडने यासाठी त्याची मदत केली. कोर्टाने ख्रिसमसच्या दिवशीच आरोपीला दोषी ठरवले. तर गर्लफ्रेंडवर सध्या खटला सुरू आहे.
असे होते प्रकरण
- 20 वर्षांची आर्किटेक्चर स्टुडंट व्हिक्टोरिया आरोपीची मैत्रीण होती. पण तिला त्याच्या क्रिमिनल रेकॉर्डची माहिती नव्हती. अॅलेक्झँडरने कोर्टात सांगितले की, वर्षाच्या सुरुवातीला व्हिक्टोरिया त्याच्या फ्लॅटवर आळी होती. तेव्हा त्याची गर्लफ्रेंड अकाटेरिनाही तिथे होती.
- अॅलेक्झँडरने फ्लॅटमध्ये व्हिक्टोरियावर दोन वेळा बलात्कार केला होता. त्यादरम्यान त्याची गर्लफ्रेंड सोफ्यावर बसून सर्वकाही पाहून एन्जॉय करत होती. त्यानंतर दोघांनी बाथरूममध्ये व्हिक्टोरियाचे शीर कापले. त्यानंतर तिच्या बॉडीचे लहान लहान तुकडे केले.
-यानंतर त्यांनी तिच्या बॉडीचे तुकडे प्लास्टीक बॅगमध्ये पॅक केले. त्यानंतर ते शहरात विविध ठिकाणी लपवले. दुसरीकडे मुलगी रात्रभर घरी आली नाही, तेव्हा कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. पण पोलिसांना तिला शोधण्यात अपयश आले.
- नंतर मुलीचे कापलेले शीर बटॉनिक गार्डनमध्ये आढळल्याने एकच गदारोळ माजला. नंतर शहरातील अनेक भागांतून बॉडीपार्ट्स मिळाल्याने प्रकरण हायप्रोफाइल बनले.
- कोर्टात त्याने सांगितले की, तरुणीने बलात्कारानतर पोलिस तक्रार करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी तिचा मर्डर केला.
Post a Comment