सर्बियातही सरकारच्या हिंसेविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.
पॅरिस/बुडापेस्ट- सरत्या वर्षातही युरोपातील दहापेक्षा जास्त देशांमध्ये जनआंदाेलन, जनआक्रोश सुरू आहे. फ्रान्समध्ये इंधनाचे वाढलेले दर व राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या आर्थिक धाेरणाविराेधात येलाे व्हेेस्ट आंदाेलन सुरू आहे. आठवड्यापासून हंगेरीत नवीन श्रम कायद्याविरोधात नागरिक कडाक्याच्या थंडीत रात्र-दिवस निदर्शने करत आहे. सर्बियातही सरकारच्या हिंसेविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. जर्मनीत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आंदाेलन सुरू आहे. पर्यावरणाचे समर्थन करणाऱ्या ग्रीन पार्टीची लाेकप्रियता गेल्या दाेन महिन्यांत १० टक्के वाढली आहे. फ्रान्समध्ये इंधनाविराेधात सुरू असलेले आंदाेलन नवीन मुद्द्यांवर अधिक व्यापक झाले आहे. जनता राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या आर्थिक धाेरणास विराेध करत आहे. नवीन आर्थिक धाेरणामुळे नाेकऱ्या गेल्याचे आंदाेलनकर्ते सांगत आहेत. आंदाेलन थांबवण्यासाठी मॅक्रॉन यांनी इंधनाच्या दरात कपात केली आहे. तसेच मजुरीचे किमान वेतन दर १०० युराेपर्यंत करण्याची घाेषणा केेली आहे.
हंगेरी : वर्षात ४०० तास ओव्हरटाइमचा विराेध
हंगेरी संसदेत १३ डिसेंबर राेजी नवीन कामगार कायदा संमत केला. कंपन्या कर्मचाऱ्यांकडून वर्षभरात ४०० तास ओव्हरटाइम करू शकतात. या कायद्यास स्मार्ट फाेनचा लाइट सुरू करून विराेध केला जात आहे.
सर्बिया : २८ वर्षांतील सर्वात माेठी निदर्शने
सर्बियामध्ये सरकारच्या हिंसेविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे १९९० च्या निदर्शनांच्या आठवणी ताज्या झाल्या. विराेधी पक्षनेते बाेकाे यांच्यावर झालेला हल्ला हा सरकारी कट असल्याचा आराेप आहे.
अल्बानिया :
महागड्या शिक्षणामुळे संताप अल्बानियात सरकारी विद्यापीठांत वार्षिक शुल्क १६० ते २५६० युराे आहे. तेथील सरासरी उत्पन्न महिन्याला ३५० युराे आहे. शिक्षण स्वस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर आहेत. देशभरात महामार्ग ठप्प केले आहेत.

Post a Comment