सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज मालवण, देवबाग, तारकर्ली व देवली खाड़ी पात्रता बोटींग सफ़रिने पर्यटनाचा आनंद घेतला.
देवली येथील उदय फार्म मत्स्य शेती केंद्र येथे तारकर्ली येथून बोटीने सफर करत देवली येथे दाखल झाले. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. प्रदेश चिटणीस व्हिक्टर डॉन्टस, नगरसेवक अबिद नाईक, प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष विश्वास साठे, आगोस्तीन डिसोजा, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. देवली कोळंबी प्रकल्पाची पाहणी केली.

Post a comment