0
  • Madhuri dixit from pune seat in upcoming loksabha elections From BJPमुंबई- भारतीय जनता पक्षाने (भाजप) बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षित- नेने हिला देशाच्या राजकारणात उतरविण्याची तयारी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माधुरीला पुण्यातून उमेदावारी देण्यावर भाजपच्या गोटात चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मागील जून महिन्यात मुंबई येथे माधुरीची भेट घेतली होती. यावेळी माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने हेही उपस्थित होते.‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानासाठी शहा मुंबईत पोहोचले होते.
    माधुरीची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निवड करण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी माधुरी दीक्षित हिला उमदेवारी देण्यावर पक्ष विचाराधीन आहे. माधुरीसाठी पुणे लोकसभा मतदार संघ अनुकूल आहे. देशातील अनेक लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांचे नाव निर्धारित करण्‍याची प्रक्रिया सुरु असून माधुरीचे नाव पुणे लोकसभेसाठी निर्धारित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
    51 वर्षीय माधुरी ‘तेजाब‘, ‘हम आपके हैं कौन‘, ‘दिल तो पागल है‘, ‘साजन‘ आणि ‘देवदास‘ सारख्या सुपरहिट सिनेमात झळकली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली होती. पुणे लोकसभा संघ काँग्रेसच्या ताब्यात होता. भाजपचे खा. अनिल शिरोळे यांनी पुण्यात कमळ फुलवले होते. तीन लाखाहून जास्त मताधिक्याने विजयी झाले होते.

Post a Comment

 
Top