0
शहरात गेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून खोदाकामामुळे सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यात खड्डय़ांनी भरलेले रस्ते वाहनधारकांना तारेवरची कसरत करायला भाग पाडत आहेत. अशीच अवस्था प्रशासकीय इमारत समोरील रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ता बंद झाल्याने झाली आहे. वाहनधारकांची यामुळे डोकेदुखी वाढली आहे. तसेच मोनार्क चौक बंद केल्याने वाहतूक वायसी कॉलेज रस्त्याकडून पुन्हा पोवईनाका अशी वळवण्यात आली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम रस्ताच सापडत नसल्याने उपरस्त्यांनी जाण्यासाठी वाहनधारकांची धडपड होत आहे.
वाहतूक केंडी सुटावी यासाठी गेड सेपरेटरचे काम सुरू आहे. तहसीलदार कार्यालय रस्ता, पोवईनाका, राजपथ या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. या खोदकामामुळे वाहतूक व्यवस्थेत वारंवार बदल करण्यात येत असल्याने वाहनधारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनधारकांना फक्त कोंडीचा सामना करावा लागत नसून रस्त्यात पडलेल्या खड्डय़ांमुळे कंबरडे मोडत आहे. हे खड्डे भरण्यात यावेत, अशी मागणी वारंवार केल्याने ढिम्म प्रशासनाला जाग आली असून सगळय़ात जास्त एक फुटांचे खड्डे प्रशासकीय इमारत ते एसटी स्टॅण्डकडे जाणाऱया रस्त्यावर पडले हेते. ते भरून काढण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. कामाच्या पहिल्या दिवशी वाहनधारक या रस्त्याचा वापर करत होते. यामुळे कामात अडथळा निर्माण होत होता. तो कमी करण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला. या रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र वाहनधारक यातून मार्ग काढत आहेत. या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने याचा फायदा वाहनधारक घेत आहेत…..

Post a Comment

 
Top