नंतर गूगलवर काही सर्च करत होती महिला, पण झाला होता उशीर
टेक्सास. अमेरिकेच्या एका कोर्टाने एका महिलेला मुलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिला दोषी ठरवत 40 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही महिला आपल्या दोन लहान-लहान मुलींना कारमध्ये बंद करुन पार्टी करण्यास गेली होती. कारमध्ये बंद राहून गुदमरल्यामुळे या दोन चिमुरडींचा मृत्यू झाला होता. कोर्टातील सुनावणीदरम्यान महिलेने स्वतः निर्दोष असल्याचे अनेक कारणं सांगितले, पण जजने तिचा एकही तर्क मानला नाही, तिला गैरजबाबदार ठरवत तिला दोषी मानन्यात आले आणि 40 वर्षांची शिक्षा सुनावली.
दूस-या दिवशी आली मुलींची आठवण
- दोन मुलींच्या मृत्यूची ही हृदयद्रावक घटना 7 जून 2017 ला रिल काउंटी मध्ये घडली. 19 वर्षीय अमांडा हॉकिन्स आपल्या मुली ब्रायन (1 वर्षे) आणि एडिसन(2 वर्षे) यांना कारमध्ये घेऊन बाहेर निघाली आणि नंतर त्या दोघींना कारमध्येच सोडून मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेली.
- पार्टीमध्ये नशा केल्यामुळे महिलेला शुध्द राहिली नाही आणि या दोन मुली कारमध्येच राहिल्या. या दोन्ही मुली 15 ते 18 तास कारमध्येच बंद होत्या. यादरम्यान कारमधील तापमान वाढून जवळपास 32 डिग्री सेल्सियस झाले, यामध्ये गर्मीमध्ये जीव गुदमरल्यामुळे या दोघींचा मृत्यू झाला.
- या महिलेला दुस-या दिवशी दुपारी मुलींची आठवण आली. पण तोपर्यंत मुलींचा मृत्यू झाला होता. यानंतर ती त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी पुढचे 40 तास मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. तिने मुलींना वाचवण्यासाठी काही टिप्स गूगलवरही सर्च केल्या होत्या.
महिलेने स्वतःचा बचाव करण्यासाठी सांगितले विचित्र कारण
कोर्टामध्ये झालेल्या सुनवाईदरम्यान स्वतःला निर्दोष ठरवण्यासाठी महिलेने विचित्र कारण सांगितले. ती म्हणाली की, बाजूच्या तलावातून फुलांचा गंध येत होता, यामुळे मुलींचा मृत्यू झाला. या फुलांच्या सुगंधामुळे माझ्या मुलींचा जीव गुदमरला असे ती म्हणाली. पण कोर्टाने तिचे हे कारण मान्य केले नाही.
- पोलिसांनी कोर्टात सांगितले की, मुलांचा रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर एका शेजा-याने अमांडाला फोन केला होता, पण ती म्हणाली की, सर्व काही ठिक आहे, त्या रडत रडत झोपी जातील.
- सुनवाई करताना जजने महिलेला गैरजबाबदार आणि असंवेदनशील वागणूक केली म्हणत दोषी ठरवले. कोर्ट म्हणाले की, आईच्या गैरजबाबदारपणामुळे दोन निर्दोष मुलींचा बळी गेला. जर आईने थोडी संवेदनशीलता दाखवली असती, तर आज या मुली जिवंत असल्या. कोर्ट म्हणाले की, लोक आपल्या पाळीव प्राण्यांसाठीही एवढे असंवेदनशील नसतात.
Post a Comment