0
हॉस्पिटलमध्ये जाण्यापर्यंत गेली दृष्टी, आता चालणे आणि तोंडातून आवाज येणेही झाले बंद

बर्मिंघम. एक महिला ब्रिटेनमधून अमेरिकेत सुट्या घालवण्यासाठी गेली होती. पण ही ट्रिप तिच्यासाठी जिवघेणी ठरेल असा विचारही तिने केला नव्हता. 32 वर्षांची कॅथरीन नेडलोवू आपल्या कुटूंबासोबत अमेरिकेच्या कॅरिबियनमध्ये पोहोचली होती. दूस-या दिवशी त्याच्या कानात प्रचंड वेदना होऊ लागल्या. या वेदना कानातून त्याच्या डोक्यापर्यंत गेल्या. महिलेला हॉस्पिटलमध्ये नेले तोपर्यंत तिची दृष्टी गेली होती. त्याच्या शरीराच्या अनेक अंगांनी काम करणे बंद केले होते.


- डॉक्टर्सने चेकअप केले तोपर्यंत महिलेच्या तोंडातून आवाज निघणेही बंद झाला आणि ती आपल्या पायांवरही उभी राहू शकत नव्हती. सुरुवातीला डॉक्टरांना वाटले की, हा स्ट्रोक आहे आणि यामुळेच महिलेची तब्येत बिघडली, पण असे नव्हते. नंतर महिलेला पुन्हा ब्रिटेन येथे आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी सांगितले की, तिला मेंदूमध्ये खुप भयंकर इन्फेक्शन rhombencephalitis झाले आहे.


कसेबसे वाचले प्राण
डॉक्टरांनी सांगितले की, महिलेच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन झाले आहे याचे निदान लवकर झाले नसते, तर ती कोमात गेली असती. या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांना खुप प्रयत्न करावे लागले. डॉक्टरांनी सांगितले की, या इन्फेक्शन मुळे तिच्या मेंदूला इजा झाली आहे.

पुन्हा चालायला शिकली
- मेंदूला इजा झाल्यामुळे या महिलेचे चालणे-फिरणे बंद झाले होते. तिला एका लहान मुलाप्रमाणे पुन्हा चालणे शिकवण्यात आले. या आजारामुळे कॅथरीनच्या कुटूंबातील लोकांची सर्व कमाई खर्च झाली आणि आता तिचे कुटूंब फंड मी नामच्या पेजवर लोकांकडून मदत मागत आहे.

इन्फेक्शनचे कारण शोधत आहेत डॉक्टर
- या महिलेला हे विदेशात जाऊन झाले की, ते यापुर्वीच झाले होते याचा तपास डॉक्टर्स करत आहेत.
Woman have brain infection during Foriegn Trip

Post a comment

 
Top