औरंगाबाद- केवळ ओळख असताना एकतर्फी प्रेम स्वीकारण्याचा हट्ट करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचा कटरने गळा चिरून खून केला. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एन-१२ डी सेक्टर येथे ही घटना घडली. सुनंदा शिवाजी ऊर्फ प्रमोद वाघमारे (२५) असे मृत महिलेचे, तर शुभम भाऊसाहेब बागूल (२५, रा. सिद्धार्थनगर) असे आरोपीचे नाव आहे.
सुनंदाचा पती दारू पिऊन छळ करत असल्याने ती आईसोबत जाधवमंडी येथे राहत होती. नंतर तिने एकटे राहण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीसह सिद्धार्थनगरातील कचरू एकनाथ गाडेकर यांच्या तीनमजली घरात पाच बाय पाचच्या खोलीत भाड्याने राहण्यासाठी आली होती. ती धुणीभांडी व पोळ्या करत होती. शुभमचे नातेवाईक याच चौकात राहत असल्याने तो नेहमीच चौकातील मंदिरात येऊन बसायचा. शुभम व सुनंदाची पूर्वीपासून ओळख होती. मात्र एकतर्फी प्रेमातून तो तिला त्रास देऊ लागला. दोन दिवसांपूर्वी शुभम तिच्या घरी गेला होता. त्याने सुनंदासोबत वाद घालून शेजाऱ्यांसोबतही भांडण केले. गुरुवारी सुनंदाची मुले घरात नसताना शुभम तिच्या खाेलीत आला. अचानक त्यांच्यात भांडण सुरू झाले. रागाच्या भरात शुभमने सुनंदाचा कटरने गळा चिरला. आवाजामुळे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीने खिडकीतून हा प्रकार पाहिल्यानंतर तिने सिडको पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी यांना कळवले. परदेशी यांच्यासह उपनिरीक्षक भारत पाचोळे, जमादार नरसिंग पवार, इरफान खान, संतोष मुदिराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनंदाचा श्वास सुरू होता. रक्ताने माखलेले कटर घटनास्थळी होते, तर भिंत व दरवाजावर रक्त उडालेले होते. रक्तप्रवाह थांबण्यासाठी कपडा गुंडाळून पोलिसांनी तिला तत्काळ घाटीत दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
रक्ताने माखलेले हात घेऊन पायी चालत होता :
सुनंदाचा खून केल्यानंतर शुभम बाहेर पडला. त्याचे कपडे व हात रक्ताने माखलेले हाेते. त्याचे नातेवाईक त्याच चौकात राहत असल्याने त्याला जाताना काही स्थानिकांनी पाहिले. परिसरातील काही तरुणांना मी खून केला, असे सांगून तो पुढे निघाला. सिडको पोलिस ठाण्याचे किशोर गाडे, सुरेश भिसे, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे यांना हा प्रकार कळताच त्यांनी पाठलाग करत त्याला शताब्दीनगरमधून ताब्यात घेतले. दरम्यान, ती मला फसवत होती. त्यामुळेच तिचा काटा काढला, असे शुभमने पोलिसांना सांगितले.
दोन दिवसांपूर्वी दिली धमकी :
सुनंदाच्या मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शुभमने वाद घातला हाेता. त्यानंतर सुनंदाने त्याच्या घरी जाऊन हा प्रकार कुटुंबीयांना सांगत पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. तेव्हा त्याने मी आधीच जेलमध्ये राहून आलो आहे, तक्रार करू नको, असे म्हणत स्वत:च्या गळ्याला चाकू लावत विनवणी केली होती.
गुन्हेगारी प्रवृत्तीचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०१३ मध्ये जबरी चोरीचा, तर २०१४ मध्ये अल्पवयीन मुलीच्या वि
नयभंगप्रकरणी पोस्को आणि २०१५ मध्ये महिलेच्या विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल

Post a Comment