0
मुंबई. दीपिका-रणवीरच्या लग्नाचे तिसरे आणि शेवटचे रिसेप्शन शनिवारी हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडले. रिसेप्शनमध्ये रणवीर सिंह टक्सीडोमध्ये दिसला तर दीपिकाने रेड कलरचा गाउन घातला होता. विशेष म्हणजे बॉलिवूडकरांसाठी ठेवण्यात आलेल्याया पार्टीमध्ये दीपवीर एकदम फिल्मी अंदाजात पोहोचले. एका फोटोमध्ये दीपिका लेग्स दाखवत आहे तर टक्सिडोमध्ये रणवीर शेजारी बसला आहे. दीपिका-रणवीरच्या तिस-या रिसेप्शनमध्ये पाहूण्यांना इन्विटेशन कार्ड पाठवण्यात आले होते, हे लाल रंगाचे होते. यासोतबच पाहूण्यांना रिसेप्शनच्या थीमनुसार ब्लॅक टाय घालण्यास सांगण्यात आले. तर 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या रिसेप्शनमध्ये दीपिकाचे कुटूंब क्रीम कलरच्या थीममध्ये दिसले होते तर रणवीरचे कुटूंब ब्लॅक थीममध्ये दिसले होते.


दीपिकाने 14015 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे लग्न केले. 14 तारखेला कोंकणी पध्दतीने लग्न झाले तर 15 नोव्हेंबर रोजी सिंधी पध्दतीने लग्न झाले. लग्नानंतर 21 डिसेंबरला दोघांनी बेंगळुरुमध्ये दीपिकाच्या नातेवाईकांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. तर नंतर रणवीरच्या नातेवाईकांसाठी 28 नोव्हेंबर रोजी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. 30 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर आपल्या कुटूंबासोबत सिध्दी विनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी चाहत्यांनी त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. दीपिका-रणवीरने 5 वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. 'गोलियों की रासलीला : रामलीला' (2013) या चित्रपटाच्या सेटपासून त्यांचे अफेअर सुरु झाले होते.
Deepika Ranveer Third Reception in Grand Hayat Mumbai

Post a Comment

 
Top