0
  • blob:https://ultima.bhaskar.com/db211f2e-8f3c-487f-a8e4-65a897ff903aमुंबई- रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये कंटेनर यार्डमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत एक कामगार जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशामक दल पोहोचले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळी 15 गाड्या दाखल झाल्या आहेत. ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
    मिळालेली माहिती अशी की, उरणमधील चिरले गावातील वैष्‍णो कंटेनरमध्ये ही आग लागली आहे. कंटेनरमध्ये केमिकल भरलेले आहे. आगीत एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईवरून विशेष मदत मागविण्यात आल्याचे समजते.

Post a Comment

 
Top