0
जयपूरचे आयुर्वेदिक डॉक्टर राजेंद्र कुमावत सांगतात की, फक्त सौंदर्यासंबंधीच नाही तर घरासंबंधित समस्या दूर करण्यात कापूर

थंड हवेत त्वचा आणि केसांसंबंधित समस्या होणे कॉमन आहे. या वातावरणात यांना जास्त केयरची गरज असते. अशा वेळी थोडेसे कापूर तुमची समस्या दूर करु शकते. जयपूरचे आयुर्वेदिक डॉक्टर राजेंद्र कुमावत सांगतात की, फक्त सौंदर्यासंबंधीच नाही तर घरासंबंधित समस्या दूर करण्यात कापूर मदत करते.


1. चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा असेल तर रात्री झोपताना कच्च्या दुधामध्ये थोडेसे कापूर मिसळून कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या.


2. पिंपल्समुळे त्रस्त आहात तर खोबऱ्याच्या तेलामध्ये थोडेसे कापूर मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ लावा. काही दिवसांमध्येच हे सुकेल आणि त्यांचे डाग दूर होतील.


3. कोंड्यामुळे त्रस्त असाल तर कोमट खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळून मसाज करा. एका तासानंतर केसांवर शॅम्पू करा. कोंडा दूर होण्यासोबतच केस मजबूत होतील.


4. पायाच्या भेगांवर मध, कापूर आणि मीठाचा लेप लावा. थोडा वेळ पाय कोमट पाण्यात टाकून बसा. थोड्या वेळानंतर स्क्रब करुन मॉश्चराइजर क्रीम लावा.


5. केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कोमट खोबरेल तेलात कापूर मिक्स करुन केसांवर हल्की मसाज करा. उवांसोबतच लिका नष्ट होतील.


6. एखाद्या जखमेची खूण असेल तर तेथे कापूर पाण्यात मिसळून लावा. थोड्या दिवसात खूण दूर होईल.


7. हिवाळ्यात माशा, डासांमुळे त्रस्त असाल तर घरात कापूर जाळा. याची स्मेल आणि धुराने ते घरातून दूर जातात. वेळोवेळी हा उपाय करत राहा.


8. घरात मुंग्यांमुळे त्रस्त असाल तर पाण्यात कापूर डिजॉल्व करुन घराच्या सर्व कोप-यांमध्ये स्प्रे करा. याच्या स्मेलने मुंग्या दूर होतात. ही पध्दत पूर्णपणे सेफ आहे.


9. पलंगावर ढेकून झाले तर गादी पहिले उन्हात ठेवावी. यानंतर गादी आणि बेडशीटखाली कापुराचे तुकडे टाकावे. याच्या स्मेलने ढेकून दूर होतील.


10. थकवा दूर करण्यासाठी अंघोळीला जात असाल तर पाण्यात कापूर इसेंशियल ऑइलचे काही थेंब मिसळा. याने शरीराच्या रक्तप्रवाहत सुधारणा होईल आणि शरीर रिलॅक्स होईल.


11. पेट्सच्या मैट्रेसवर कापुराचे तुकडे ठेवावे. याच्या उग्र वासाने केसांमधील उवा दूर होतात. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.


12. किडा चावला तर त्वचेवर इरिटेशन किंवा सूज येण्याची समस्या होते. अशा वेळी कापूर, नारळ तेलामध्ये मिसळून अफेक्टेड एरियावर लावा.
Ayurveda kapur tips for health

Post a comment

 
Top