0
वडगाव स्मशानाजवळ दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली. बुधवारी सकाळी शहापूर व सीसीआयबी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून एक गावठी पिस्तूल, दोन तलवारी, स्टंप जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी आदी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवारी सकाळी ही कारवाई केली आहे. संदीप उर्फ सॅन्डी प्रकाश जाधव (वय 31, रा. भारतनगर, शहापूर), दर्शन नारायण पाटील (वय 23, रा. भारतनगर, शहापूर), मारुती कल्लाप्पा बिरादार (वय 23, रा. मुतगा), महादेव पुंडलिक तुळजाई (वय 21), महेश परशराम मेलगे (वय 21, दोघेही रा. अवचारहट्टी), रवी यशवंत पाटील (वय 28, रा. अन्नपूर्णेश्वरीनगर, येळ्ळूर रोड, वडगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सर्व सहा जणांविरुद्ध भा.दं.वि. 399, 402 व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा 25 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक बी. के. नदाफ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, एस. एल. देशनूर, ईश्वर बडीगेर, सुरेश कांबळे, व्ही. पी. बुदण्णावर, एस. आर. दोडनायकर, बी. एम. मुत्नाळ, एस. सी. कोरे, आर. एस. नाईकवाडी, बी. एन. बळगण्णावर, एम. एम. वडेयर, सी. जे. चिन्नाप्पगोळ, ए. के. कांबळे, एस. आर. मेत्री, एस. एस. पाटील आदींनी ही कारवाई केली.
यासंबंधी गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त महानिंग नंदगावी यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व सहा जण दरोडय़ाच्या तयारीत होते. शहापूर व सीसीआयबी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ते लोकांबरोबर भांडण काढून त्यांना धमकावत होते. याबरोबरच अनेक प्रकरणात मांडवलीसाठी गुंडगिरी करीत होते. गावठी पिस्तूल, स्टंप, तलवारींचा धाक दाखवून ते दहशत निर्माण करीत होते, असे त्यांनी सांगितले.https://www.tarunbharat.com/wp-content/uploads/2018/12/5di-48.jpg

Post a Comment

 
Top