0
आयव्हीएफ तंत्रामुळे यापेक्षाही मोठ्या वयाच्या महिला गर्भवती

पूंछ- जम्मू-काश्मीरमये पूंछच्या रुग्णालयात बुधवारी एका ६५ वर्षे वयाच्या महिलेने एक मुलीस जन्म दिला. महिलेचा पती हकीम दीन (८०) यांनी यास अल्लाहची भेट असल्याचे म्हटले. दांपत्यास दहा वर्षांचा एक मुलगा आहे. या महिलेने सांगितले, सामान्य बाळंतपण झाले. सीएमओ डॉ. मुमताज बट्टी व जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गुलाम अहमद मलिक यांनी सांगितले, महिलेचे जन्म प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांचा दावा ग्राह्य धरता येत नाही. खरेच त्यांचे वय ६५ असेल व जगातील सर्वाधिक वयाच्या त्या माता ठरतील.

भारतात साधारणत: वयाच्या ४७ वर्षांपर्यंत महिलांची मासिक पाळी बंद होते. त्यानंतर त्या महिला माता होऊ शकत नाहीत. परंतु आयव्हीएफ तंत्राने यापेक्षाही जास्त वयाच्या माता झालेल्या आहेत.
65 year old women get pregnant

Post a Comment

 
Top