सनीने पहिल्यांदा नाकारली होती बिग बॉसची ऑफर, सांगितले का दिला होता नंतर होकार
मुंबईः अभिनेत्री करीना कपूर सनी लिओनीचा नवरा डेनियल वेबरवर एवढी इम्प्रेस झाली आहे की, सैफ अली खानने एकदा डेनियलची भेट घ्यावी असे तिला वाटत आहे. करीनाने तिचा रेडिओ शो 'व्हॉट वुमन वाँट विद करीना कपूर'मध्ये असे म्हटले आहे. झाले असे की, या शोमध्ये सनी लिओनी पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यावेळी करीनासोबत बातचित करताना सनी म्हणाली की, डेनियल माझ्या आयुष्यात आल्याने मी खूप आनंदी आहे. सनीने सांगितले, "डेनियल तिची मुलगी निशाची काळजी घेण्यात तिला मदत करतो. मग ते डायपर बदलणे असो किंवा तिला खाऊ घालणे असो, मुलांची कामे तो आनंदाने करतो." सनीचे हे बोलणे ऐकून करीना म्हणाली की, एकदा सैफची डेनियलसोबत भेट घडवून आणायला हवी.
करीनाही नेहमी करत असते सैफचे कौतुक...
- करीनासुद्धा नेहमी सैफचे कौतुक करत असते. अनेकदा ती मुलाखतींमध्ये म्हणाली आहे की, सैफ तिच्या आयुष्यात आल्याने ती स्वतःला नशीबवान समजते. सैफचं मला समजू शकतो, तो प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठिशी उभा राहतो, असेही ती म्हणाली. शूटिंगमध्ये बिझी असताना तिच्यामागे सैफच मुलगा तैमूरची काळजी घेतो, असेही ती सांगते.
सनीने नाकारली होती 'बिग बॉस'ची ऑफर
- सनी लिओनीने करीनाच्या शोमध्ये सांगितले की, तिने सुरुवातीला 'बिग बॉस'ची ऑफर नाकारली होती. कारण तिला अनेक लोकांचे तिरस्काराचे मेल्स येत होते. त्यानंतर शोच्या मेकर्सनी तिला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पाठवले, ते अॅनालाइज करुन रिसर्च केल्यानंतर तिने या शोसाठी आपला होकार कळवला होता. 2011 मध्ये सनीने 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. शोच्या एका एपिसोडमध्ये महेश भट पाहुणे म्हणून आले होते शोमध्येच त्यांनी सनीला त्यांच्या सिनेामसाठी निवडले. मात्र सनीचा पदार्पणातील सिनेमा यशस्वी ठरला नव्हता. 'जिस्म 2' हा तिचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण त्यानंतर आलेले तिचे सिनेमे चांगले चालले. 'जिस्म 2' (2012), 'जॅकपॉट' (2013), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'एक पहेली लीला' (2015), 'कुछ-कुछ लोचा है' (2015), 'मस्तीजादे' (2016), 'वन नाइट स्टँड' (2016) यासह अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले. 2017 मध्ये तिला अखेरचा चित्रपट तेरा इंतजार रिलीज झाला होता. Splitsvilla या टीव्ही शोच्या सातव्या आणि आठव्या पर्वाची ती होस्ट होती.
वयाच्या 19 व्या वर्षी आली होती पोर्न इंडस्ट्रीत...
सनीने पोर्न इंडस्ट्रीत वयाच्या 19 व्या वर्षी पहिले पाऊल ठेवले होते. तिने सर्वप्रथम लेस्बियन परफॉर्मन्स दिला होता. सेक्शुअॅलिटी आणि पर्सनल लाइफविषयी मोकळेपणाने बोलून तिने लोकांची मनं जिंकली होती. पोर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सनी एका जर्मन बेकरी आणि टॅक्स अँड रिटायर्मेंट फर्ममध्ये कामला होती. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली होती. सनीने स्वमर्जीने पोर्न इंडस्ट्रीत येण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा तिने याविषयी तिच्या पालकांना सांगितले होते, तेव्हा ते तिच्यावर रागावले होते. एका मुलाखतीत सनी म्हणाली होती. "मी आईवडिलांच्या परवानगीविना या क्षेत्राची निवड केली होती. माझ्यासाठी हा एक बिझनेस होता. जेव्हा मी पेंटहाऊस (अॅडल्ट इंडस्ट्रीचे फेमस मॅगझिन)कव्हर ऑफ द इयर आणि $100,000 (आजच्या भारतीय चलनानुसार 68 लाख रुपये) जिंकले, तेव्हा मी माझ्या पालकांना या फिल्डविषयी सांगितले होते. साहजिकच प्रत्येक आईवडिलांप्रमाणे तेही माझ्यावर चिडले. पण मला माझ्या आयुष्यात काय करायचे, हे निवडण्याचे स्वातंत्र आहे, हे त्यांना सांगितल्यावर ते कन्विंस झाले होते." 2003 मध्ये सनीने विविड एन्टरटेन्मेंटसोबत तीन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट करुन हार्डकोर पोर्नोग्राफीत पाऊल ठेवले होते. तिने सुमारे 41 अॅडल्ट फिल्म्समध्ये अभिनेत्री म्हणून काम केले, तर 25 फिल्म्सचे दिग्दर्शन केले. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सनीने हे पोर्न इंडस्ट्री सोडली.

Post a Comment