जयपूर/हैदराबाद - राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेसाठी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राजस्थान विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदान होत आहे. अलवरच्या रामगडमधील बसपा उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्याने मतदान रद्द करण्यात आले आहे. राजस्थानात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.11% मतदान झाले आहे. तर तेलंगणाच्या 119 जागांवरही मतदान सुरू आहे. येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 8.97% मतदानाची नोंद झाली.
-
-
-
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment