इंटरनॅशनल डेस्क - बॉलिवूड सिंगर मिका सिंगला दुबईत अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. एका ब्राझीलियन तरुणीला अभद्र फोटो पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
रिपोर्टसनुसार, मुरक्काबाद पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये सध्या मिकाला ठेवण्यात आले आहे. 17 वर्षीय ब्राझीलियन तरुणीने पोलिसांत मिकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
मिका दुबईत परफॉर्मन्ससाठी आलेला होता. दरम्यान, मिकाच्या सुटकेसाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न सुरू केल्याचीही माहिती समोर येत आहे.
मिका दुबईत परफॉर्मन्ससाठी आलेला होता. दरम्यान, मिकाच्या सुटकेसाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न सुरू केल्याचीही माहिती समोर येत आहे.
कायम वाद ओढवून घेतो मिका...
मिकाने वाद ओढवून घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा मिकाची वादग्रस्त प्रकरणे समोर आली आहेत. राखी सावंतला जाहीर किस केल्यामुळेही मिका चर्चेत होता.

Post a Comment