0
राजाचा एक हत्ती खूप शांत होता, जेथे हत्तीला ठेवले होते तेथेच चोरांनी आपला अड्डा केला होता, आता हत्ती रोज चोरांच्या गोष्ट

एका राजाकडे एक खूप शांत हत्ती होता. हत्ती आपल्या माहुताने सांगितलेल्या सर्व आज्ञांचे पालन करत होता. राजालाही तो हत्ती खूप प्रिय होता. यामुळे या हत्तीची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली होती. ज्या ठिकाणी हत्तीला ठेवले होते तेथेच काही चोरांनी आपला अड्डा तयार केला.

> चोर रोज तेथे यायचे आणि आपल्या चोरीचे कारनामे एकमेकांना सांगायचे. भविष्यात चोरीची प्लॅनिंग करायचे, एकमेकांची प्रशंसा करायचे. हत्ती रोज त्या चोरांच्या गप्पा ऐकायचा. हळू-हळू हत्तीला असे वाटू लागले की, हे सर्व लोक चांगले काम करत आहेत.

> हत्तीवर चोरांच्या गप्पांचा असा प्रभाव पडला की, तोसुद्धा आक्रमक झाला. एके दिवशी त्याने आपल्या माहुताला पायाखाली घेऊन मारून टाकले.

> राजाला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने दुसरा माहूत हत्तीच्या देखभालीसाठी ठेवला. काही दिवसांनी हत्तीने त्यालाही मारून टाकले.

> एका शांत हत्तीमध्ये एवढे परिवर्तन कसे झाले, या विचाराने राजा चिंतीत झाला. त्यानंतर राजाने एका बुद्धिमान वैद्याला बोलावले.

> वैद्याने हत्तीला तपासले आणि त्याच्या जवळपास असलेल्या क्षेत्राची पाहणी केली. त्याच्या लक्षात आले की, हत्ती असलेल्या ठिकाणी जवळच चोरांचा अड्डा आहे.

> वैद्याने राजाला सांगून त्या चोरांना पकडवले आणि त्या ठिकणी साधू-संतांना राहण्याची जागा दिली.

> आता हत्ती दररोज साधू-संतांच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकू लागला. हळू-हळू त्याचा आक्रमक स्वभाव शांत होऊ लागला आणि तो पुन्हा पूर्वीप्रमाणे झाला. राजाने वैद्याचा सन्मान केला.

> या कथेची शिकवण अशी आहे की, आपल्यावर हळूहळू का होईना परंतु आपल्या संगतीचा प्रभाव अवश्य पडतो. आपण वाईट लोकांसोबत राहिल्यास आपली मानसिकता त्याप्रमाणेच बनते. यामुळे संतांचा सहवास असावा असे सांगण्यात येते. रोज थोडावेळ तरी प्रवचन ऐकावे. यामुळे वाईट गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडत नाही.motivational story of king and elephant in marathi

Post a Comment

 
Top