0
मदिना - सौदी अरबमध्ये एका व्यक्तीने पत्नी लग्नात पत्नीचा चेहरा पाहताच तिला तलाक देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे लग्नाच्याच दिवशी हे घडले. नवरदेव आणि नवरीने यापूर्वी एकमेकांना पाहिले नव्हते. त्यामुळे असे घडले. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांना नवरदेवाला चांगलाच विरोध दर्शवला.


रडतच राहिली नवरी
- सौदी अरबच्या पश्चिमेला असलेले मदिना शहरात एका व्यक्तीने लग्नाच्या रात्री पहिल्यांदाच पत्नीचा चेहरा पाहिला तर त्याने लगेचच पत्नीला तलाक दिला.
- लग्नादरम्यान फोटोग्राफरने फोटोसाठी नवरीला चेहऱ्यावरील नकाब काढण्यास सांगितल्यानंतर नवरी नकाब काढून हसली तेव्हा पहिल्यांदा नवरदेवाने तिचा चेहरा पाहिला.
- नवरीचा चेहरा पाहताच नवरदेव रागाने लालबुंद झाला. तो जागेवर उभी राहिला आणि म्हणाला, मी जशी कल्पना केली होती तू तशी नाहीस. मला माफ कर पण मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही. मी तुला तलाक देतो.
- स्थानिय वृत्तपत्राच्या वृत्तानुसार नवरदेव असे बोलतान नवरीला धक्का बसला. ती रडायला लागली. रडून रडून तिची वाईट अवस्था झाली. पाहुण्यांनी नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला पण काहीही फायदा झाला नाही.

सोशल मीडियावर निघाला लोकांचा राग
- नवरदेवाच्या मते, लग्नाआधी त्याने नवरीचा चेहरा पाहिला नव्हता. लग्नाच्या दिवशी जेव्हा त्याने नवरीचा चेहरा पाहिला तेव्हा त्याला वाईट वाटले. त्यानंतर त्याने लग्न रद्द केले होते.
- दगा देणाऱ्या या नवऱ्याबाबत सोशल मीडियावर त्याच्या विरोधात लोकांचा रागाचा भडका उडाला. विशेषतः यूझर्सने त्या नवरदेवाला चांगलेच खरेखोटे सुनावत राग व्यक्त केला.
- एका यूझरने लिहिले, व्यक्तीने त्याच्या बेजबाबदार वर्तनाने महिलेला अडचणीत टाकले आहे, याची शिक्षा त्याला मिळायला पाहिजे.
- एकाने लिहिले, त्या व्यक्तीने नवरीचे बाह्य सौंदर्य पाहण्याऐवजी ती मनाने किती सुंदर आहे पाहायला हवे.Groom gives Talaq to wife in wedding ceremony after he saw her face

Post a comment

 
Top