गणेश आणि सारिकाचे एकमेकांवर प्रेम होते. 22 ऑक्टोबर दोघे पळूनही गेले होते.
सांगली- तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे चुलत भाऊ-बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांना लग्नही करायचे होते. परंतु घरच्यांनी विरोध केल्यामुळे दोघांना टोकाचे पाऊल उचलले आणि जीवनप्रवास संपविला. गणेश पाटील (34) आणि सारिका पाटील (20, दोघेही रा. बोरगाव) अशी मृतांची नावे आहेत.
काय आहे हे प्रकरण?
गणेश आणि सारिकाचे एकमेकांवर प्रेम होते. 22 ऑक्टोबर दोघे पळूनही गेले होते. 10 दिवसांनी दोघे घरी परत आले. एकमेकांवर दोघांचे प्रेम असून लग्न करायचे असल्याचे घरच्यांना सांगितले. परंतु गणेश व सारिका हे एकाच भावकीतील असून ते चुलन भाऊ-बहिण असल्याने त्यांना विरोध झाला. भावकीतील लोकांनी त्यांना समजावून सांगितले. परंतु दोघेही ऐकण्यास तयार नव्हते. घरचे लोक लग्नास होणार देणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर गणेश आणि सारिकाने राजपूर रस्त्यावरील पाटील मळ्यातील द्राक्ष बागेत विष प्राशन करू आत्महत्या केली. या प्रकरणी तासगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment